प्रभाग ४- महेंद्रनगर-२

By Admin | Updated: January 23, 2015 01:03 IST2015-01-23T01:03:36+5:302015-01-23T01:03:36+5:30

बॉक्स..

Division 4- Mahendranagar-2 | प्रभाग ४- महेंद्रनगर-२

प्रभाग ४- महेंद्रनगर-२

क्स..
दररोज लागतात ४० टँकर
बंदेनवाजनगर आणि प्रबुद्धनगर येथे पाण्याची पाईपलाईनच टाकण्यात आली नाही. त्यामुळे येथील नागरिकांची तहान भागविण्यासाठी दररोज तब्बल ४० टँकरची आवश्यकता असते. यशोदीप कॉलनी येथील पाण्याच्या टाकीवरून हे टँकर दिवसभर परिसरातील वस्त्यांना पाणी पुरवितात.

बॉक्स...
एका मुलीचा जीव घेणारा खड्डा आजही तसाच
बंदेनवाजनगरात अनेक मोकळे प्लॉट आहेत. या प्लॉटमालकांनी घराच्या कामासाठी खड्डे खोदून ठेवले आहेत परंतु कामाला सुरुवात केली नाही. त्यामुळे त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून आहे. यापैकी एक खड्डा असाच जीवघेणा बनला आहे. प्लॉटला कुठलीही सुरक्षा भिंत नाही. त्यामुळे लहान मुले येथे खेळतात. तीन वर्षांपूर्वी येथील खड्ड्यात पडून एका शाळकरी मुलीचा जीव गेला होता. परंतु त्यानंतरही हा खड्डा बुजवण्यात आलेला नाही. आजही तो तसाच असून धोकादायक बनलेला आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊन झालीत. तक्रारीसुद्धा करण्यात आल्या. परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. पुन्हा एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी केला आहे.

बॉक्स..
महेंद्रनगरात मैदान-उद्यान केवळ नावालाच
महेंद्रनगर येथे एक मोकळे मैदान आहे. याला उद्यान म्हणून विकसित करण्याची योजना आहे, परंतु मैदानाच्या नावावर इथे काहीच सुविधा नाही. सुरक्षा भिंत बांधलेली आहे, परंतु ती पूर्ण नाही. मैदानातच शीतला माता मंदिर आहे. त्यामुळे दररोज येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्यासाठी मैदानात बसायला जागासुद्धा नाही. लहान मुलांना खेळता येईल असे साहित्य नाही. मोठ्यांना मैदानात फिरता येईल अशी सुविधा नाही. एकूणच येथील मैदान व उद्यान केवळ नावालाच आहे.

बॉक्स..
विहीर बनली कचराघर
महेंद्रनगर येथील शीतला माता मंदिर परिसरात एक जुनी विहीर आहे. परंतु सध्या या विहिरीचा उपयोग कचराकुंडी म्हणून केला जात आहे. कचऱ्यामुळे ती बुजली आहे. विहिरीचा उपयोग होत नसल्याने ती बुजविण्याची गरज असल्याचे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे.

बॉक्स..
नळाला दूषित पाणी
नालंदानगर, सन्यालनगर, बँक कॉलनी या परिसरात मागील अनेक दिवसांपासून नळातून दूषित पाणी येत आहे. पाईपलाईन लीकेज झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याची माहिती आहे. लीकेज दुरुस्तीबाबत झोन कार्यालयात अनेकदा निवेदने देण्यात आली परंतु अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

Web Title: Division 4- Mahendranagar-2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.