प्रभाग-३ -गरीबनवाजनगर-३

By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:20+5:302015-01-22T00:07:20+5:30

Division-3-Garibhajanagar-3 | प्रभाग-३ -गरीबनवाजनगर-३

प्रभाग-३ -गरीबनवाजनगर-३

>बॉक्स...
कचऱ्याने वेढलेले ट्रान्सफॉर्मर

संपूर्ण वस्त्यांना विद्युत पुरवठा करणारे एक ट्रान्सफॉर्मर संघर्षनगर येथे आहे. परंतु या ट्रान्सफॉर्मरच्या सभोवतालचा भाग कचराघर बनले आहे. ट्रान्सफॉर्मर कचऱ्याने वेढलेला असतो. या कचऱ्यामुळे ट्रान्सफॉर्मरला दोनदा आग लागली आहे. तेव्हा संपूर्ण वस्तीमध्ये अंधार पसरला होता. ही आग येथील कचऱ्यामुळेच लागली. तरी सुद्धा येथील कचरा साफ केला जात नाही.

बॉक्स.
असमतोल विकास कामे

गरीबनवाजनगर येथे काही विकास कामे झाली आहेत. परंतु विकास असमतोल होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. गरीबनवाजनगर येथील काही गल्ल्यांमध्ये सिमेंट रोड बनले आहेत. परंतु तीन गल्ल्यांमध्ये रस्ताच बनलेला नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. नाले बुजलेले आहेत. त्याकडे कुणाचेही लक्ष नाही.

नागरिकांच्या प्रतिक्रिया
आमचाच रस्ता का नाही - अहमद खान
गरीबनवाजनगरात काही भागांमधील सिमेंटचे रस्ते बनवण्यात आले. ही चांगली बाब आहे. परंतु तीन गल्ल्यांमधील रस्त्यांना अद्याप सुरुवातच करण्यात आलेली नाही. हा दुजाभाव का? इथलेच रस्ते का बनवण्यात येत नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असतोष पसरलेला आहे.

गटारी फुटलेल्या आहेत- अजिजा परवीन
गरीबनवाजनगर येथील बहुतांश गटारी फुटलेल्या आहेत. त्यामुळे गटारीचे पाणी उघड्यावर वाहून परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. लोकांना जगणे कठीण झाले आहेत. गटारी स्वच्छ करण्यासाठी बोलावले असता कुणी ढंुकूनही पाहात नाही. आलेच तर पैशाशिवाय काम करीत नाही.

नळाची व गटार लाईन लागूनच - मो. मुश्ताक
नळाची लाईन आणि गटार लाईन लागूनच गेली आहे. गटाराीची पाईप लाईन लीकेज असल्याने पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येत असते. अशा वातावरणात येथील नागरिकांना राहावे लागते. महापालिकेने याकडे तातडीने लक्ष द्यावे.

आमच्याच खर्चाने टाकली गडर लाईन - हुसैना बी
काही वर्षांपूर्वी वस्तीमध्ये गडर लाईन नव्हती. महापालिकेकडे वारंवार निवेदने दिली परंतु काहीही फायदा झाला नाही. अखेर नाईलाजास्तव वस्तीतील नागरिकांनी आपल्याच पैशाने वस्तीत गडर लाईन टाकली. परंतु ती सुद्धा आता जागोजागी फुटलेली आहे.

रस्ता तातडीने व्हावा - तारा बी
आमच्या परिसरातील तीन गल्ल्यांमधील रस्ता अजूनही झालेला नाही. इतर ठिकाणी सिमेंटचे रस्ते झाले, मात्र आम्हाला तसेच ठेवण्यात आले आहे. हा दुजाभाव दूर करण्यात यावा, आमचाही रस्ता तातडीने तयार करावा.

Web Title: Division-3-Garibhajanagar-3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.