प्रभाग -३ गरीबनवाजनगर-४
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:37+5:302015-01-22T00:07:37+5:30
नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही - शेख मेहबूब

प्रभाग -३ गरीबनवाजनगर-४
न कसान भरपाई अजूनही मिळालेली नाही - शेख मेहबूब वस्तीतून एक नाला गेला आहे. या नाल्याला पावसाळ्यात दरवर्षीच पूर येतो. घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होते. गेल्यावर्षी सुद्धा प्रचंड नुकसान झाले. सर्वे करण्यात आले. नुकसानग्रस्तांची नावे लिहून नेली. परंतु त्यांना नुकसान भरपाई मात्र अजूनही मिळालेली नाही. आम्ही जगायचे तरी कसे हा मुख्य प्रश्न आहे. - एक दिवसाच्या आड पाणी येते- शफी कुन्नीसा आमच्या वस्तीमध्ये पाण्याची फारशी टंचाई नाही. परंतु एक दिवसाच्या आड पाणी येते. दररोज पाणी आल्यास आणखी चांगले होईल. सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे कचऱ्याची आहे. कचरा उचलणारी गाडी वस्तीत फिरकतच नाही. नळाची पाईपलाईन टाकली पण, पाणीच नाही - मो. अकबर मीटरवरील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन नुकतीच टाकली. स्वत:च्या खर्चाने ती पाईपलाईन टाकली, मात्र आता पाणी वर चढत नसल्याने संपूर्ण खर्च वाया गेला आहे. प्रशासनाला सांगितले तर हात वर करतात. कित्येक वर्षांपासून नाल्याची सफाईच झाली नाही - हाफीज अब्दुल बासिद संघर्षनगर येथून नाला हा कित्येक वर्षांपासून साफच झालेला नाही. त्यामुळे हा नाला जवळपास बुजलेला आहे. नाल्यातच कचरा साचला आहे. नाल्याची सफाई तातडीने न झाल्यास यंदाही पावसाळ्यात पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात दरवर्षी येथील घरांमध्ये नाल्याचे पाणी जाते. तेव्हा नाल्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. गटारीचे पाणी घरात शिरते - जैबुन्निसा नाल्याच्या शेजारी राहत असल्याने तसाही मोठा त्रास आहेच. परंतु गटारीचे पाणी घरात साचत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. घरात भरण भरले. मात्र दुर्गंधी जात नाही. नळाच्या पाण्याला सुद्धा दुर्गंध येतो. दुर्गंधीमुळे जगणे कठीण - चांद बी मेहबूब नाल्याचे आणि गटारीचे पाणी घरात पाझरत असल्याने संपूर्ण घरात दुर्गंध पसरतो. तशाच वातावरणात राहावे लागत आहे. घरामध्ये दरी किंवा पोते टाकून राहावे लागते. परंतु दुर्गंधी मात्र जात नाही. त्यामुळे जगणे कठीण झाले आहे.