ॅजिल्हा वाहतूक शाखेतर्फे पाच हजार वाहनांवर कारवाई
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:32+5:302015-08-26T23:32:32+5:30
कुबेर चवरे : एक हजार जणांना पाठविला नोटिसा

ॅजिल्हा वाहतूक शाखेतर्फे पाच हजार वाहनांवर कारवाई
क बेर चवरे : एक हजार जणांना पाठविला नोटिसाजळगाव: जिल्हा वाहतूक शाखा स्वतंत्र अस्तित्वात आल्यानंतर या विभागातर्फे राबविण्यात आलेल्या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या ५१ हजार ३७३ वाहनांवर तर अवैध प्रवाशी वाहतूक करणार्या एक हजार ४६३ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुबेर चवरे यांनी दिली. दरम्यान, अवैध प्रवाशी वाहतूक करणार्या एक हजार वाहनचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून १२ सप्टेबर रोजी होणार्या महालोक अदालतीत हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेतर्फे कारवाईची मोहीम राबविण्यात आली. त्यात महामार्गावर हेल्मेट न बाळगणे, दुचाकीवर तीन सीट बसविणे, सीट बेल्ट, लायसन्स व कागदपत्रे न बाळगणे, धोकादायक माल भरणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, रोडरोमिओ, फ्रंटसीट प्रवाशी बसविणे आदी जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.