श्रीरामपूर जिल्‘ासाठी दुसरी चूल जिल्हा विकास परिषद गठीत : मागणी एक, समित्या दोन

By Admin | Updated: July 15, 2015 00:15 IST2015-07-15T00:15:01+5:302015-07-15T00:15:01+5:30

श्रीरामपूर : श्रीरामपूर जिल्हा करण्याच्या मागणीसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती अस्तित्वात असताना या समितीच्या कार्यकारिणीतून दूर ठेवल्याने मंगळवारी राजकीय पुढार्‍यांनी श्रीरामपूर जिल्हा विकास परिषदेची स्थापना केली.

For the district of Shrirampur, another district development council is formed: demand one, two committees | श्रीरामपूर जिल्‘ासाठी दुसरी चूल जिल्हा विकास परिषद गठीत : मागणी एक, समित्या दोन

श्रीरामपूर जिल्‘ासाठी दुसरी चूल जिल्हा विकास परिषद गठीत : मागणी एक, समित्या दोन

रीरामपूर : श्रीरामपूर जिल्हा करण्याच्या मागणीसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती अस्तित्वात असताना या समितीच्या कार्यकारिणीतून दूर ठेवल्याने मंगळवारी राजकीय पुढार्‍यांनी श्रीरामपूर जिल्हा विकास परिषदेची स्थापना केली.
रिपाइंचे सुभाष त्रिभुवन यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली. त्यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत ते स्वत: संस्थापक अध्यक्ष आहेत. अध्यक्ष बाबा शिंदे (मनसे), कार्याध्यक्ष विजय जैस्वाल (विहिंप), संघटक संदीप मगर (भीमशक्ती), सचिव सुभाष जंगले (छावा संघटना), उपाध्यक्ष मारूती बिंगले (भाजप), लकी सेठी (राष्ट्रवादी), सचिन बडधे (शिवसेना), रियाज पठाण (काँग्रेस), सहसचिव प्रवीण फरगडे (राष्ट्रवादी), प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय खेमनर (धनगर समाज संघटना), कोषाध्यक्ष कपिल दायमा (शिवसेना), सहकोषाध्यक्ष हनीफ पठाण (लहूजी सेना), कायदेशीर सल्लागार ॲड. रमेश कोळेकर, सहसंघटक राजेंद्र भालेराव (एकलव्य संघटना) यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.
तर सिद्धार्थ मुरकुटे, करण ससाणे, संजय छल्लारे, सुनील महांकाळे, लक्ष्मण साळुंके, जीवन सुरूडे, विजय तलरेजा, इम्रान पटेल, संजय हजारे, प्रवीण पैठणकर, अमित कुकरेजा, विजय काळे, इम्रान शेख, बाळासाहेब बागुल, राजेंद्र पवार, अस्लम शेख हे सदस्य आहेत. तर माजी आमदार भानुदास मुरकुटे, ॲड. दौलतराव पवार, जयंत ससाणे, प्रकाश चित्ते, राजेंद्र देवकर, सुदर्शन शितोळे, बाळासाहेब पटारे, अविनाश आदिक, महेंद्र त्रिभुवन, अशोक दिवे, प्रताप देवरे हे परिषदेचे मार्गदर्शक असल्याचे संस्थापक अध्यक्ष त्रिभुवन यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. आमदार भाऊसाहेब कांबळे यांना परिषदेत स्थान देण्यात आले नाही.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा कृती समितीला भाजपने पाठिंबा दिला आहे. तसाच पाठिंबा या परिषदेला आहे. कोण काम करते यापेक्षा काम करणे महत्त्वाचे आहे. श्रीरामपूर जिल्हा व्हावा, ही पुढार्‍यांची नाही तर नागरिकांची मागणी आहे. यासाठी श्रीरामपूर अनुकूल असून यासाठी पक्षाच्या वरिष्ठांची निश्चित मदत होईल. (प्रतिनिधी)
----राष्ट्रवादीला घरचा आहेर----
राष्ट्रवादी व काँग्रेस श्रीरामपूर जिल्हा कधीच करणार नाहीत. शिवसेना-भाजप युतीचेच सरकार श्रीरामपूर जिल्हा करू शकतो, असा घरचा आहेर देत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा कृती समिती हा सुरुवातीपासून अराजकीय फोरम होता. त्यांनी राजकीय हेवेदावे टाळण्यासाठीच तसे स्वरूप ठेवले. दोन्ही काँग्रेस कदापिही श्रीरामपूर जिल्हा करू शकत नाही. पण दोन्ही काँग्रेसनेच श्रीरामपूरच्या विकासासाठी हातभार लावल्याने विकासाचे श्रेय या दोन पक्षांना निश्चितच आहे.

Web Title: For the district of Shrirampur, another district development council is formed: demand one, two committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.