जिल्हाध्यक्षपदी शंकरराव वाकोडे कायम छावा संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:37+5:302015-01-31T00:34:37+5:30

अकोला - छावा संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मनीषा वडजे पाटील यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा छावा संघटनेची नवीन कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी शंकरराव वाकोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारीणीमध्ये जिल्हा सचिवपदी मनीराम ताले यांची निवड करण्यात आली असून, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे आहे. संघटनेचे ध्येयधोरण ठरविण्यासाठी एक जिल्हा नियोजन समिती गठित करण्यात आली असून, यामध्ये सु. ज्ञा. खुमकर, ॲड. बाळासाहेब वखरे, डॉ. संजय सरोदे, अरविंद कपले, संतोष ढोरे, बाळासाहेब लाहोळे यांचा समावेश करण्यात आला आहे. उपजिल्हाप्रमुखपदी मनोहर गीरी, निवृत्ती वानखडे, कैलास सेवलकर, भारत मडांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा संघटकपदी डॉ. संतोष भिसे, सुभाष पाटील इंगळे, अम

District President of Shankarrao Wakode permanently called the Chhawa Sangh as District President | जिल्हाध्यक्षपदी शंकरराव वाकोडे कायम छावा संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जिल्हाध्यक्षपदी शंकरराव वाकोडे कायम छावा संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

ोला - छावा संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मनीषा वडजे पाटील यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा छावा संघटनेची नवीन कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी शंकरराव वाकोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारीणीमध्ये जिल्हा सचिवपदी मनीराम ताले यांची निवड करण्यात आली असून, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे आहे. संघटनेचे ध्येयधोरण ठरविण्यासाठी एक जिल्हा नियोजन समिती गठित करण्यात आली असून, यामध्ये सु. ज्ञा. खुमकर, ॲड. बाळासाहेब वखरे, डॉ. संजय सरोदे, अरविंद कपले, संतोष ढोरे, बाळासाहेब लाहोळे यांचा समावेश करण्यात आला आहे. उपजिल्हाप्रमुखपदी मनोहर गीरी, निवृत्ती वानखडे, कैलास सेवलकर, भारत मडांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा संघटकपदी डॉ. संतोष भिसे, सुभाष पाटील इंगळे, अमोल हिंगणे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यालयीन सचिव म्हणूण विठ्ठल वाकोडे, निखिल बोरीकर, गजू भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाळू लंघे, चेतन लोखंडे, डॉ. प्रमोद विखे, ब्रम्हा भाकरे, प्रवीण बानेरकर यांची सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्षभर राबविण्यात येणार्‍या विविध कार्यक्रमांसाठी वारकरी संघटनशक्ती तयार करण्यात आली असून, यामध्ये हभप अमृत महाराज, हभप छोटू महाराज, शरद राखोंडे महाराज, प्रकाश काकड महाराज, धनेश्वर ढोर महाराज यांचा समावेश करण्यात आला आहे. तालुकाप्रमुखांचीही नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये अकोला तालुकाप्रमुखपदी मनोहर मांगटे पाटील, बार्शीटाकळी शंकरराव हागे, पातूूर गोपाळराव गालट, तेल्हारा श्याम कोल्हे, बाळापूर मन्साराम मेटांगे, अकोट ब्रम्हा पांडे, बाळापूर तालुक्याचे संघटक म्हणून शशी दांदळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल‘ातील सदस्य म्हणून राहुल देवकते, मंगेश लाहुळकर, सुरेश श्रीनाथ, राजेश ढेरे, ज्ञानेश्वर थोरात, धनंजय काकड, रमेश ढोरे, संदीप चांभारे, पीयूष तिरुख व गजानन लाहुळकर यांची नियुक्ती करण्यात आली.

Web Title: District President of Shankarrao Wakode permanently called the Chhawa Sangh as District President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.