सबळ पुराव्याअभावी चौघांची मुक्तता जिल्हा न्यायालयाचा निकाल : कासमपुरा येथील डॉक्टर खून प्रकरण
By Admin | Updated: March 22, 2016 00:39 IST2016-03-22T00:39:27+5:302016-03-22T00:39:27+5:30
जळगाव : पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथील रहिवासी डॉ.रमणलाल बन्सीलाल जैन यांच्या खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाने चौघांची सोमवारी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

सबळ पुराव्याअभावी चौघांची मुक्तता जिल्हा न्यायालयाचा निकाल : कासमपुरा येथील डॉक्टर खून प्रकरण
ज गाव : पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथील रहिवासी डॉ.रमणलाल बन्सीलाल जैन यांच्या खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाने चौघांची सोमवारी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.या खटल्याची थोडक्यात हकिकत अशी, कासमपुरा येथील डॉ.रमणलाल जैन (वय ६४) यांची ६ जुलै २०१३ रोजी शेतजमिनीच्या वादातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पेशंट तपासणीचे काम आटोपून ते जळगावहून कासमपुर्याला दुचाकीने परत जात होते. या वेळी त्यांच्या सोबत रामेश्वर चुनीलाल पांडे (रा.कासमपूर, ता.पाचोरा) हेदेखील होते. याप्रकरणी रामेश्वर पांडे यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात दिलीप फुलचंद जैन, अनिल पूनमचंद राठोड, सागर तुळशीराम पाटील व परशुराम उर्फ पंकज परमेश्वर पाटील यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३०७ सह आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला होता. हा खटला न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांच्या न्यायालयात चालला. त्यात संशयितांविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने चौघांची निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षातर्फे ॲड.टी.डी. पाटील यांनी तर आरोपींतर्फे ॲड.अकिल इस्माइल, ॲड.विजय दर्जी व ॲड.शिरूडे यांनी कामकाज पाहिले.