शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

कुमुदा-आर्यन शुगर्सवर आरआरसीप्रमाणे कारवाई करा जिल्हाधिकारी : तत्काळ कार्यवाही करण्याचे तहसीलदारांना आदेश

By admin | Updated: July 7, 2015 22:56 IST

बार्शी :

बार्शी :
तालुक्यातील खामगाव येथील आर्यन शुगर्स साखर कारखान्याकडे शेतकर्‍यांच्या ऊस बिलाची असलेली थकबाकी जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे (आरआरसी) वसूल करून वसुलीची रक्कम तहसीलदार यांच्या लेख्यात जमा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना दिले आहेत. या वसुलीची कार्यवाही तत्काळ करावी, असे जिल्हाधिकारी यांनी या पत्रात म्हटले आहे.
सन २०१४-१५ मध्ये आर्यन शुगर्सकडे ऊस गाळपासाठी दिलेल्या बहुतांश शेतकर्‍यांना ऊसबिलापोटीच्या पहिल्या हप्त्याची रक्कमदेखील अद्याप मिळालेली नाही़ यासाठी कारखान्याचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक डॉ.अविनाश भोसले, व्हा़ चेअरमन बापू नलावडे तसेच इतर संचालक मंडळ व कारखाना व्यवस्थापनाशी संबंधित ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी वारंवार बिलासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ऊस गाळप होऊन हंगाम बंद झाला व पंधरा दिवसात पेेमेंट देणे कायद्याने बंधनकारक असताना चार महिने झाले तरीही शेतकर्‍यांना उसाचे बिल न मिळाल्याने अखेर जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पीडित ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी दि. १४ मेपासून बार्शी तहसीलसमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे ़ आंदोलनाच्या रेट्याने अखेर प्रशासनाला जाग येऊन दि. २६ मे रोजी साखर आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी आरआरसीनुसार कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्तेची विहीत पध्दतीद्वारे विक्री करून गाळप हंगाम २०१४-१५ मधील एफआरपीप्रमाणे ऊस देयबाकी रक्कम आदेशाप्रमाणे वसूल करण्याबाबत कळविलेले आहे. त्यानंतर सुमारे दीड महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर आता जिल्हाधिकारी यांनी साखर आयुक्तांच्या पत्राचा संदर्भ देत आरआरसीप्रमाणे वसुलीचे आदेश तहसीलदार यांना दिले आहेत.