जिल्हा वार्षिक योजना आज विभागीय बैठक
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30
नागपूर: २०१५-२०१६ या वर्षासाठी नागपूर विभागातील सहा जिल्ांच्या वार्षिक योजनांना अंतिम मंजुरी देण्याबाबत बुधवारी स. ११ वा. विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हा वार्षिक योजना आज विभागीय बैठक
न गपूर: २०१५-२०१६ या वर्षासाठी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांना अंतिम मंजुरी देण्याबाबत बुधवारी स. ११ वा. विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विभागातील इतर जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. २०१४-१५ या वर्षासाठी नागपूर जिल्ह्याची वार्षिक योजना २२५ कोटींची होती. या वर्षी त्यात वाढ करून देण्याची मागणी आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०१५-१६ या वर्षासाठी ६८५ कोटी रुपयांचे प्रस्ताव विविध योजनांकडून सादर करण्यात आले आहे. त्यात सर्वसाधारण योजना ४४४.५९ कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना १३६.२३ कोटी, आदिवासी उपाययोजना २६.०८ कोटी आणि ओटीएसपी ७८.५० कोटी रुपयांचा समावेश आहे. हा आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. यावर बुधवारच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. नागपूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्याला घसघशीत निधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान सकाळी १० वा. आयुक्त कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पाणी आरक्षण समितीची बैठक होणार असून दुपारी ३ वा. वनामतीच्या सभागृहात कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)