शेतकर्यांच्या प्रबोधनासाठी जिल्हा प्रशासन सरसावले शेतकरी सबलीकरण मोहीमेची व्युहरचना: सुरु करणार फ्री हेल्पलाईन, गावागावात स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रबोधन, देणार शपथा
By Admin | Updated: December 14, 2014 00:07 IST2014-12-12T23:49:15+5:302014-12-14T00:07:08+5:30
लातूर: जिल्ातील शेतकर्यांच्या आत्महत्येवर गंभीर झालेल्या जिल्हा प्रशासनाने शेतकरी सबलीकरणाच्या मोहीमेला गती दिली आहे. यादृष्टीने शुक्रवारी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्युहरचनेसंदर्भात चर्चा करण्यात आली. सहकार, कृषी, दुग्ध, स्वयंसेवी संस्था, मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शेतकरी सबलीकरण मोहीमेच्या व्युहरचनेवर चर्चा करण्यात आली.

शेतकर्यांच्या प्रबोधनासाठी जिल्हा प्रशासन सरसावले शेतकरी सबलीकरण मोहीमेची व्युहरचना: सुरु करणार फ्री हेल्पलाईन, गावागावात स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रबोधन, देणार शपथा
लातूर: जिल्ातील शेतकर्यांच्या आत्महत्येवर गंभीर झालेल्या जिल्हा प्रशासनाने शेतकरी सबलीकरणाच्या मोहीमेला गती दिली आहे. यादृष्टीने शुक्रवारी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्युहरचनेसंदर्भात चर्चा करण्यात आली. सहकार, कृषी, दुग्ध, स्वयंसेवी संस्था, मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शेतकरी सबलीकरण मोहीमेच्या व्युहरचनेवर चर्चा करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. मागच्या महिन्यात दहाहून अधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्याने जिल्ात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविली होती. यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी शेतकर्यांच्या आत्महत्येमागची मानसशास्त्रीय कारणे आणि उपाय तर पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी शेतकर्यांपुढील समस्या आणि उपाय यावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण केले. तर जिल्हा कृषी अधिकारी टी. एस. मोटे, जिल्हा उपनिबंधक घोलकर, श्री. श्री. रविशंकर परिवाराच्या मकरंद जाधव आणि ॲड. गोमारे, आरटीआय कार्यकर्ते लक्ष्मण वंगे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीन भराटे आदींनी आपली मते मांडली. यावरुन शेतकरी आत्महत्येविरोधात जागर करण्यासाठी शेतकरी सबलीकरण मोहीमेची संकल्पना पुढे आली.
या बैठकीला पोलिस अधिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, उपजिल्हाधिकारी गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वभंर मुळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
मोफत हेल्पलाईन
शेतकर्यांना आपले मन मोकळे करता यावे, यासाठी जिल्हा प्रशासन एक स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करेल. यात कामाच्या वेळा वाटून घेतलेले समुपदेशक आलेल्या दूरध्वनीवर शेतकर्यांना मार्गदर्शन करतील.
स्वयंसेवी संस्थामार्फत गावा-गावात प्रबोधनाचा जागर
येत्या आठवडाभरात शहरातील स्वयंसेवी संस्था, एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी, एनसीसीचे कमांडर यांची एक विशेष बैठक जिल्हा नियोजन सभागृहात बोलाविण्यात येईल. यात इच्छुकांना दुष्काळाने होरपळणार्या गावांचे प्रत्येकी चार पाच गावाप्रमाणे वाटप करण्यात येईल. त्या संस्थांच्या प्रमुखांना मानसोपचार तज्ज्ञ समुपदेश करण्याच्या पध्दतीचे प्रशिक्षण देतील. मग हे प्रतिनिधी गावा-गावात शेतकर्यांचे प्रबोधन आणि समुपदेशन करतील.
शेतकर्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याला प्रोत्साहन
शेतकर्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च सोपा व्हावा म्हणून खास शेतकर्यांच्या उपवर पाल्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याला प्रोत्साहन देण्यात येईल.
दुष्काळी परिस्थितीसाठी कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी महसूलस अन्य विभागाच्या कर्मचार्यांचे एक दिवसाचे वेतन देण्याबाबत विचारविनीमय सुरू असून या वेतन शेतकर्यांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांवर खर्च करण्यात येईल.
मनरेगा व जलसंधारणाची कामे वाढविणार
दुष्काळी परिस्थितीला तोंड देता यावे यासाठी जिल्ात मनरेगा व जलसंधारणाची कामे वाढविण्यात येतील. या कामातून गावा-गावात रोजगार उपलब्ध करुन हाताला काम उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. जलसंधारणासाठीही स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येईल.
ग्रामदिन, ग्रामसभेला शपथग्रहण
गावात ग्रामदिनी आणि ग्रामसभेदिनी शेतकर्यांना आत्महत्या हद्दपार करण्याची शपथ देण्यात येईल.