सातपूर परिसरात विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:46+5:302015-06-15T21:29:46+5:30

सातपूर : नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाल्याने सातपूर परिसरातील महापालिका, तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये नवागतांचे स्वागत करण्याबरोबरच सर्वशिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

Distribution of books to students in Satpur area | सातपूर परिसरात विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप

सातपूर परिसरात विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप

तपूर : नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाल्याने सातपूर परिसरातील महापालिका, तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये नवागतांचे स्वागत करण्याबरोबरच सर्वशिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय
सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात संस्थेचे चिटणीस देवराम पुरकर, प्रभाग सभापती उषा शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत नवागतांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुलोचना गांगुर्डे (प्राथमिक) यांनी केले. स्वागत मुख्याध्यापक जयश्री पाटील (माध्यमिक) यांनी केले. प्रारंभी विद्यालयातील विद्यार्थ्यांची परिसरातून ग्रंथदिंडी आणि शाळा प्रवेश दिंडी काढण्यात आली. सूत्रसंचालन प्रल्हाद रायते यांनी केले. विजय धुमाळ यांनी आभार मानले.
स्वारबाबानगर मनपा शाळा
स्वारबाबानगर मनपा शाळेत नगरसेवक प्रकाश लोंढे, नंदिनी जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, तसेच गणवेश वाटप करण्यात आले. प्रास्ताविक केंद्र समन्वयक मंदा निकम यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र जाधव यांनी केले. यावेळी अमीन शेख, समाधान जगताप, नंदकुमार जाधव, सुरेंद्र लाहोरी, सुनील अहिरे, बबन भुजबळ, अजयसिंग आदिंसह पालक उपस्थित होते.
जिजामाता शाळा
सातपूर कॉलनीतील महापालिकेच्या जिजामाता शाळेत प्रभाग सभापती उषा शेळके, मनपा विभागीय अधिकारी महेंद्र पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व शालेय गणवेश वाटप करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक कैलास ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन नितीन देशमुख यांनी केले. आशा भोई यांनी आभार मानले. प्रारंभी परिसरातून विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी व शाळा प्रवेश दिंडी काढण्यात आली.
मॉडर्न शाळा
अशोकनगर येथील मॉडर्न प्राथमिक विद्यालयात प्रभाग सभापती उषा शेळके, स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक श्रीधर मुरली यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शशिकांत जाधव, संस्थेचे सचिव विश्वास ठाकूर, किसनराव विधाते, डॉ. झुंबर भंदुरे आदि उपस्थित होते.

Web Title: Distribution of books to students in Satpur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.