शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पतीने कुत्र्याच्या निराधार पिल्लाला घरी आणल्याने 'ती' अस्वस्थ; पत्नीनं घेतला टोकाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 12:51 IST

उत्तराखंडमधील उधमसिंग येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील उधमसिंग येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे कुत्र्याच्या लहान पिल्लावरून पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. खरं तर हा वाद इतका वाढला की पत्नीने टोकाचा निर्णय घेत जीवन संपवले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेच्या माहेरच्यांनी पतीसह सासरच्या 5 जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हुंड्यासाठी हत्येचा आरोप करत मृत महिलेच्या भावाने पतीसह सासरच्या 5 जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे.

पतीने निराधार पिल्लाला घरी आणले होतेपोलीस चौकी बन्नाखेडा अंतर्गत बल्ली येथील रहिवासी सूरज सैनी यांनी बुधवारी कुत्र्याच्या एका निराधार पिल्लाला घरी आणले. एसएसआय विक्रम सिंगधामी यांनी सांगितले की, तपासादरम्यान असे आढळून आले आहे की, पिल्लाला घरी आणल्याने पती आणि पत्नीमध्ये वाद झाला होता.

घरात गळफास घेऊन केली आत्महत्याघरात कुत्र्याच्या पिल्लाला आणल्याने नाराज होऊन 21 वर्षीय उर्मिलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रशासनाच्या उपस्थितीत पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी काशीपूर येथे पाठवला. मृत महिलेचा भाऊ दिनेश याने पती व इतर सासरच्या मंडळींवर पोलीस चौकी बनखेडा येथे तक्रार देऊन हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप केला आहे. तसेच लग्नानंतर सासरच्यांनी हुंड्यात बुलेट बाईकच्या मागणीसाठी उर्मिलाचा छळ सुरू केल्याचा आरोप आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडdogकुत्राhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यूPoliceपोलिस