लक्ष विचलित करून परदेशी नागरिकांची रक्कम लंपास
By Admin | Updated: September 4, 2015 00:46 IST2015-09-03T23:05:40+5:302015-09-04T00:46:17+5:30
नाशिक : शर्टावर घाण पडल्याचे सांगून अल्पवयीन मुलांनी इस्त्रायलच्या नागरिकाचे सुमारे ५५ हजार रुपये लंपास केल्याची घटना बुधवारी (दि़२) दुपारी घडली़

लक्ष विचलित करून परदेशी नागरिकांची रक्कम लंपास
नाशिक : शर्टावर घाण पडल्याचे सांगून अल्पवयीन मुलांनी इस्त्रायलच्या नागरिकाचे सुमारे ५५ हजार रुपये लंपास केल्याची घटना बुधवारी (दि़२) दुपारी घडली़
याबाबत अधिक माहिती अशी की, यासिझोवी हाहाम (३९, इस्त्राईल नागरिक, हल्ली राहणार धनलक्ष्मी लॉन्स, राजपुरोहित आश्रम, औरंगाबाद रोड) हे बुधवारी दुपारी कमोद पेट्रोलपंपाजवळून पायी जात होते़ त्यावेळी अल्पवयीन मुलांनी तुमच्या शर्टवर घाण लागल्याचे सांगितले असता हाहाम आपल्याकडील तीन झोले खाली ठेवले व घाण धुण्यासाठी गेले़ शर्ट साफ करून आल्यानंतर पाहतो तर त्यांचे तिन्ही झोले लंपास झालेले होते़ त्यामध्ये चार हजार रुपये, ४० हजार रुपये किमतीचे ८०० डॉलर, इस्त्राईल पासपोर्ट, नोकिया कंपनीचा मोबाइल व कागदपत्रे होती़
या घटनेनंतर यासिझोवी हाहाम यांनी आडगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ त्यानुसार आडगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)