डिङोलची दरकपात, पेट्रोलची दरवाढ कंपन्यांनी रोखली
By Admin | Updated: September 17, 2014 01:39 IST2014-09-17T01:39:55+5:302014-09-17T01:39:55+5:30
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्यानंतर देशातील डिङोलच्या किमतीमध्ये प्रति लिटर 35 पैशांची होऊ शकणारी कपात तेल कंपन्यांनी रोखली आहे.
डिङोलची दरकपात, पेट्रोलची दरवाढ कंपन्यांनी रोखली
नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्यानंतर देशातील डिङोलच्या किमतीमध्ये प्रति लिटर 35 पैशांची होऊ शकणारी कपात तेल कंपन्यांनी रोखली आहे. डिङोलच्या किमती मूल्य नियंत्रण व्यवस्थेतून मुक्त करण्याचा निर्णय सरकारने अद्याप घेतला नसल्याचे कारण त्यासाठी पुढे केले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवडय़ात डिङोलचे नियंत्रित किरकोळ मूल्य आणि आयात मूल्य यात केवळ 8 पैशांची तफावत होती. मात्र, आता कंपन्या 35 पैसे प्रति लिटर नफा कमावत आहेत.