युनियन पदाधिकार्यांवर बडतर्फीची कारवाई
By Admin | Updated: May 8, 2014 21:22 IST2014-05-08T21:22:18+5:302014-05-08T21:22:18+5:30
सातपूर : येथील महिंद्र ॲण्ड महिंद्र एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस व उपाध्यक्ष यांच्यावर कंपनी व्यवस्थापनाने गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत कंपनी सेवेतून बडतर्फ केल्याने कामगारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

युनियन पदाधिकार्यांवर बडतर्फीची कारवाई
स तपूर : येथील महिंद्र ॲण्ड महिंद्र एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस व उपाध्यक्ष यांच्यावर कंपनी व्यवस्थापनाने गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत कंपनी सेवेतून बडतर्फ केल्याने कामगारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्र ॲण्ड महिंद्र एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस प्रवीण शिंदे, उपाध्यक्ष अमोल सोनवणे यांच्यावर १२ मे २०१३ रोजी दोषारोप पत्र बजावले होते. दरम्यानच्या काळात ठेवण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती २५ एप्रिल रोजी या दोघा पदाधिकार्यांवर आरोप निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर आज महिंद्र ॲण्ड महिंद्र कंपनी व्यवस्थापनाने या दोघा पदाधिकार्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. कंपनी व्यवस्थापनाने या दोघांना बडतर्फीचे पत्र दिले असता पत्र घेण्यास दोघांनी नकार दिला आहे. त्यामुळे बडतर्फीचे पत्र पोस्टाद्वारे त्यांच्या घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली. विद्यमान युनियन पदाधिकार्यांवर कंपनी व्यवस्थापनाने केलेल्या बडतर्फीच्या कारवाईने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.युनियन पदाधिकार्यांची चौकशी सुरू असताना कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण अहेर यांच्याबरोबर बैठक घेऊन कठोर भूमिका घेऊ नये. एकदम तडकाफडकी बडतर्फीचा निर्णय न घेता दोन-तीन दिवस निलंबित करावे, अशी विनंती व्यवस्थापनास करण्यात आली होती. आता व्यवस्थापनाने बडतर्फीचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुंबईच्या वरिष्ठ व्यवस्थापन अधिकार्यांची भेट घेऊन बडतर्फीचा निर्णय मागे घेण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष शिरीष भावसार यांनी दिली.