फोनिक्सच्या कार्यालयात तोडफोड
By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:10+5:302015-02-14T01:07:10+5:30
नागपूर : फोनिक्स इन्फ्रा कंपनीच्या कार्यालयात संतप्त जमावाने आज दुपारी तोडफोड केली. कर्मचाऱ्यालाही मारहाण केली. या प्रकारामुळे येथे काही काळ तणाव होता. वेळीच पोलिसांनी धाव घेतल्यामुळे कर्मचारी बचावले.

फोनिक्सच्या कार्यालयात तोडफोड
न गपूर : फोनिक्स इन्फ्रा कंपनीच्या कार्यालयात संतप्त जमावाने आज दुपारी तोडफोड केली. कर्मचाऱ्यालाही मारहाण केली. या प्रकारामुळे येथे काही काळ तणाव होता. वेळीच पोलिसांनी धाव घेतल्यामुळे कर्मचारी बचावले.लोकमत चौकात फोनिक्स इन्फ्राचे कार्यालय आहे. या कंपनीच्या संचालकांनी वर्धा मार्गावरील विविध गावानजिक जमिनीवर लेआऊट टाकून भूखंडांची विक्री केली. भूखंड घेणाऱ्यांनी किस्तीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कंपनीच्या संचालकांना दिल्याचे समजते. दरम्यान, आज दुपारी ३.३० च्या सुमारास फोनिक्सच्या कार्यालयात शंभरावर महिला पुरुषांचा जमाव आला. त्यांना कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी रोखले असता त्यांनी अतुल धनविजय नामक कर्मचाऱ्याला मारहाण केली. कार्यालयात संगणकांची आणि खुर्च्या व काचेच्या तावदानांची तोडफोड केली. यामुळे कर्मचारी घाबरले. त्यांनी फोनवरून पोलिसांना कळविले. सीताबर्डी पोलिसांचा ताफा लगेच दाखल झाला. त्यांना पाहून जमाव पळून गेला. या प्रकरणात तक्रार दाखल करावी की नाही, अशी द्विधा मनस्थिती संचालकांची होती. त्यामुळे गुन्हा दाखल होण्यासाठी रात्रीचे ८.३० वाजले.----