शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मला जन्मभरासाठी अपात्र करा, लोकशाहीसाठी लढतच राहीन; राहुल गांधी यांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 06:28 IST

अदानींवरून लक्ष विचलित करण्यासाठी कारवाई

नवी दिल्ली : मला संसदेतून आजीवन अपात्र ठरविले किंवा तुरुंगवास झाला तरीही देशातील लोकशाहीचे रक्षण करत राहू, अशा शब्दात आक्रमक झालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला. घाबरलेल्या सरकारने त्यांना अपात्र ठरवून विरोधकांकडे मोठे शस्त्र दिल्याचा दावा त्यांनी केला.  

लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, अदानी मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील त्यांच्या पुढच्या भाषणाला घाबरले म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. हा संपूर्ण खेळ या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा होता. कारण, सरकारला या प्रकरणावरून भीती वाटत होती. 

अदानी प्रकरणावर प्रश्न विचारत राहणार असल्याचे सांगून राहुल गांधी म्हणाले की, अदानी शेल फर्ममध्ये  २० हजार कोटी रुपये कोणी गुंतवले आणि त्या व्यावसायिकाचे पंतप्रधानांशी काय संबंध आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. या देशात लोकशाही संपली आहे, असे सांगून ते म्हणाले की, ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्यात कधीही परकीय हस्तक्षेपाची मागणी आपण केली नाही. आपल्याविरुद्ध संसदेत खोटे बोलले गेल्याचा आरोप त्यांनी केंद्रीय मंत्र्यावर केला. यावर आपल्याला उत्तर द्यायचे आहे, परंतु परवानगी नाही, असेही ते म्हणाले. 

माफी? माझे नाव गांधी, सावरकर नाही...

माझे नाव सावरकर नाही. माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाला माफी मागत नाहीत, असे राहुल एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.ओबीसींचा अपमान केल्याचा आरोप करून भाजप लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असून, उद्योगपती अदानी यांच्याशी पंतप्रधान मोदींचे काय नाते आहे, असा सवालही त्यांनी केला. ते म्हणाले की, मी इथे भारतीय लोकांच्या आवाजाचे रक्षण करत आहे.

मी धमक्यांना, अपात्रतेला, आरोपांना, तुरुंगवासाच्या शिक्षांना घाबरत नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित होते. ते म्हणाले की, त्यांना सर्वांचे लक्ष विचलित करायचे आहे. तुम्ही चोर पकडलात, तर पहिली गोष्ट म्हणजे ते म्हणतील, मी ते केले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, ते म्हणतील तिकडे बघा, तिकडे बघा... भाजप हेच करत आहे. 

हे सर्व नाटक - ओबीसी, अपात्रता, देशद्रोही या भीतीपासून लक्ष विचलित करण्यासाठी रचले जात आहे. अदानीसोबतचे आपले संबंध उघड होत असल्याची पंतप्रधानांना भावना आहे. ते नाते उघड होणार आहे. ते कोणी थांबविणार नाही. हे होणार आहे कारण विरोधक ते उत्तर शोधणार आहेत, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस