मॅगनिज कंत्राटाचा वाद हायकोर्टात
By Admin | Updated: July 13, 2015 00:07 IST2015-07-13T00:07:07+5:302015-07-13T00:07:07+5:30
भंडारा वन परिक्षेत्रातील मॅगनिज ओर उचलण्याच्या कंत्राटासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती

मॅगनिज कंत्राटाचा वाद हायकोर्टात
नागपूर : भंडारा वन परिक्षेत्रातील मॅगनिज ओर उचलण्याच्या कंत्राटासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने याचिकाकर्त्याला लिलावात सहभागी होण्याची मोकळीक देऊन याचिका निकाली काढली.
हरिश्चंद्र दलाल असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. त्यांची कंत्राट मिळण्याची विनंती अमान्य करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने जाहिरातीनुसार अर्ज केला नाही. पात्र कंत्राटदारांच्या अर्जांवर विचार करण्यात आला. यापैकी काही कंत्राटदारांना मॅगनिज ओर उचलण्याची परवानगी देण्यात आली होती. यानंतर राज्य शासनाने १५ मार्च २०१४ रोजी यासंदर्भातील धोरणात बदल केला. नवीन धोरणानुसार लिलाव करून मॅगनिज ओर उचलण्याची परवानगी दिली जाते असे शासनातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.