वाद, तंटे सामंजस्याने निकाली काढा
By Admin | Updated: February 23, 2016 00:03 IST2016-02-23T00:03:03+5:302016-02-23T00:03:03+5:30
जळगाव : किरकोळ कारणांवरून उद्भवणारे वाद, तंटे विकोपाला जाऊन सार्वजनिक शांततेला गालबोट लागते. त्यामुळे होणार्या गंभीर स्वरुपाच्या परिणामांचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून असे वाद, तंटे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी प्रतिष्ठीत नागरिकांनी पुढाकार घ्यावा. भविष्यात दुर्दैवाने असा प्रकार घडलाच; तर त्याला खतपाणी घालणार्यांविषयी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले.

वाद, तंटे सामंजस्याने निकाली काढा
ज गाव : किरकोळ कारणांवरून उद्भवणारे वाद, तंटे विकोपाला जाऊन सार्वजनिक शांततेला गालबोट लागते. त्यामुळे होणार्या गंभीर स्वरुपाच्या परिणामांचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून असे वाद, तंटे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी प्रतिष्ठीत नागरिकांनी पुढाकार घ्यावा. भविष्यात दुर्दैवाने असा प्रकार घडलाच; तर त्याला खतपाणी घालणार्यांविषयी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले.शनिपेठ भागात रविवारी रात्री घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळच्या सुमारास शनिपेठ पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी केले. या बैठकीला शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलीक, माजी उपमहापौर करीम सालार, बिू सालार, आत्माराम ढंढोरे, आरिफ देशमुख, अब्दूल मिर्झा, मोहन तिवारी, शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, चेतन संकेत, मुकुंद सपकाळे, याकूब खान मुश्ताक खान, गोयल, शेख हारून शेख नूर, कयूम शेख, मिर्झा अब्दूल यांच्यासह शनिपेठ परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.रविवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर शनिपेठ भागात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही गटातील सदस्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन हा वाद त्वरित निकाली काढावा; तो पुढे वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. भविष्यातही परिसरात शांतता टिकून राहिल, यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे, असा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक शांततेला कुणी मुद्दाम गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला. त्याचप्रमाणे हा वाद पुढे वाढणार नाही, अशी ग्वाही बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी दिली.दुसर्या दिवशी तणावपूर्ण शांततारविवारी घडलेल्या प्रकारानंतर सोमवारी शनिपेठ भागात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. दुपारी १२ वाजेनंतर हळहळू येथील परिस्थिती पूर्वपदावर आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने शनिपेठ भागात ठिकठिकाणच्या पॉइन्टवर बंदोबस्त कायम ठेवला होता. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलिसांकडून दिवसभर पेट्रोलिंग सुरू होती.कोटदंगलीतील १२ आरोपींना अटक असून उर्वरित फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस बंदोबस्तही कायम आहे. शांतता टिकून रहावी, यासाठी शांतता समितीची बैठक घेतली. फरार आरोपींनादेखील अटक होईल.-आत्माराम प्रधान, पोलीस निरीक्षक, शनिपेठ, पोलीस ठाणे.