शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना 4 वर्षांची शिक्षा, 50 लाखांचा दंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 16:05 IST

Om Prakash Chautala Verdict: ओमप्रकाश चौटाला यांच्या चार मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

नवी दिल्ली : ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणात हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ओमप्रकाश चौटाला यांना ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवत चार वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एवढेच नाही तर ओमप्रकाश चौटाला यांच्या चार मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

ओमप्रकाश चौटाला यांना कोर्टरूममधूनच ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी ओमप्रकाश चौटाला यांच्यावतीने अपील दाखल करण्यासाठी १० दिवसांची मुदत मागितली होती, त्यावर न्यायाधीशांनी तुम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकता, असे सांगितले. दरम्यान, गुरूवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. विशेष न्यायाधीश विकास धुल यांनी ओमप्रकाश चौटाला आणि सीबीआयच्या वकिलांच्या शिक्षेवरील युक्तिवाद ऐकला होता, ज्यांना 1993 ते 2006 या कालावधीत ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक अधिक संपत्ती मिळवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. 

सुनावणीवेळी ओमप्रकाश चौटाला यांनी वृद्धापकाळ आणि वैद्यकीय कारणास्तव किमान शिक्षा देण्याची विनंती केली होती. मात्र, यातून समाजात संदेश जाईल, असे सांगत केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती केली. सीबीआयने म्हटले आहे की, ओमप्रकाश चौटाला यांना दोषी ठरवण्यात आलेले हे दुसरे प्रकरण आहे.

26 मार्च 2010 रोजी सीबीआयने माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांच्याविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. ओम प्रकाश चौटाला यांनी 1993 ते 2006 या कालावधीत 6.09 कोटी रुपयांची मालमत्ता कथितरित्या जमा केली आहे, जी त्यांच्या वैध उत्पन्नापेक्षा खूपच जास्त आहे. याचबरोबर, 2019 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांची 3 कोटी 68 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या मालमत्तांमध्ये ओम प्रकाश चौटाला यांच्या मालकीचे फ्लॅट, भूखंड आणि जमिनीचा समावेश होता. जप्त केलेल्या मालमत्ता नवी दिल्ली आणि हरयाणातील पंचकुला आणि सिरसा जिल्ह्यातील आहेत. बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली होती. 

याआधी तिहारमध्ये 10 वर्षांची शिक्षा भोगली होती दरम्यान, माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना जानेवारी 2013 मध्ये जेबीटी घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले होते. भ्रष्टाचार प्रतिबंधक प्रकरणात सात वर्षे आणि कट रचल्याबद्दल दोषी आढळल्यामुळे 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये ओम प्रकाश चौटाला आपली शिक्षा पूर्ण करून दिल्लीच्या तिहार तुरुंगातून बाहेर आले होते.

टॅग्स :Courtन्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभागHaryanaहरयाणा