शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजप संघटनेतील बदलांवर चर्चा सुरू, अमित शहा नव्या टीमची बांधणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 10:41 IST

राजस्थानमध्ये भाजपची निवडणुकीची तयारी अद्याप व्हायची आहे. वसुंधरा राजे यांच्याबाबत भाजप पक्षनेतृत्व कोणता निर्णय घेते, याकडे भाजप नेत्यांचे लक्ष लागले आहे. 

संजय शर्मा -नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात शुक्रवारी संसद भवनात प्रदीर्घ काळ झालेल्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांच्या बदलांबाबत चर्चा झाली.नड्डा यांचा अध्यक्षीय कार्यकाळ वाढल्यानंतरच त्यांनी आपल्या नवीन टीमची बांधणी सुरू केली आहे. राज्यांमध्येही संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहेत.अमित शहा यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांच्याशीही चर्चा होत आहे. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना थेट टक्कर देईल, असा भाजपकडे माजी मुख्यमंत्री डॉ.रमण सिंह यांच्यानंतर कोणताही मोठा नेता नाही. नड्डा आपल्या दौऱ्यात छत्तीसगडमधील निवडणुकीच्या भाजपच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रीय स्तरावर काही नेत्यांची नियुक्ती होणार आहे. भाजप खा.विजय बघेल यांना केंद्रात मंत्री केले जाण्याची शक्यता आहे.राजस्थानमध्ये भाजपची निवडणुकीची तयारी अद्याप व्हायची आहे. वसुंधरा राजे यांच्याबाबत भाजप पक्षनेतृत्व कोणता निर्णय घेते, याकडे भाजप नेत्यांचे लक्ष लागले आहे. 

बदलांचे महत्त्व- संघटन व सरकारमध्ये होणाऱ्या बदलांची प्रतीक्षा वाढत आहे. आधी जानेवारी महिन्यात फेरबदल करण्याची शक्यता वर्तविली जात होती. आता संसद अधिवेशनाचा पहिला टप्पा समाप्त होताच, पुन्हा एकदा सत्ता, संघटनेत फेरबदल व बदलांची शक्यता वर्तविली जात आहे. - हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. कारण हाच बदल २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप असेल, तसेच या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठीही हा बदल महत्त्वपूर्ण असेल. 

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शाहPoliticsराजकारण