न्यायडोंगरी ग्रामसभेत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा
By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:21+5:302015-08-16T23:44:21+5:30
न्यायडोंगरी : नेहमी वादग्रस्त ठरणारी न्यायडोंगरी ग्रामपालिकेची ग्रामसभा रविवारी प्रथमच प्रदीर्घ चर्चा होऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

न्यायडोंगरी ग्रामसभेत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा
न यायडोंगरी : नेहमी वादग्रस्त ठरणारी न्यायडोंगरी ग्रामपालिकेची ग्रामसभा रविवारी प्रथमच प्रदीर्घ चर्चा होऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी अनेक महत्त्वपूर्ण विषय मार्गी लावण्याचा संकल्प करण्यात आला. ६५ वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच न्यायडोंगरीत सत्तापरिवर्तन होऊन गायत्री मोरे या सरपंचपदावर विराजमान होऊन फक्त आठच दिवस झालेले असताना आजची ग्रामसभा कशी होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. ग्रामसभेस प्रचंड गर्दी झाली होती; परंतु अत्यंत शिस्तबद्ध व संयमी पद्धतीने कामकाज हाताळल्याने प्रत्येक प्रश्नावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.ग्रामसभेत प्रामुख्याने वैयक्तिक लाभाच्या योजनेचे लाभार्थी निवडणे, अनेक शासकीय खात्यात अधिकारी व कर्मचारी कमी असल्याने त्यांच्या नियुक्तीबाबत तातडीने पावले उचलणे, अंगणवाड्यांमधून वाटण्यात येणार्या पोषण आहारातील अंडी व केळी वाटपातील गौडबंगालची चौकशी करणे, शिवार रस्ते घरकूल लाभार्थी पर्यावरण संतुलित योजनेमध्ये गावाचा समावेश करणे, विकासकामांचा कृती आराखडा अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविणेकामी निर्णय घेण्यात आले.या ग्रामसभेत प्रथमच निवडून आलेल्या दहा महिला सदस्य व त्यांच्या समर्थक अशा अनेक महिला उपस्थित असताना महिलांचा अवमान करण्यात आल्याने निषेध व्यक्त करण्यात आला.दरम्यान ग्रामपालिका सदस्य अश्विनी आहेर यांनी अंगणवाडीत वाटप करण्यात येणार्या पोषण आहारासंदर्भात केवळ कागदोपत्री घोडे नाचवित घोळ घातला जात असल्याचा गौप्यस्फोट केल्याने उपस्थितांमध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.------चौकटमी एकटीच गावाची सरपंच नसून, आपण सर्वच सरपंच आहोत, या भावनेतून गावाचा विकास करूया. गाव नक्कीच सुजलाम् सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही.- गायत्री शशिकांत मोरे, सरपंच, ग्रामपालिका न्यायडोंगरी.------