दिल्ली भाजपचे पराभवाबद्दल विचारमंथन प्रदेशाध्यक्ष उपाध्याय यांनी घेतली बैठक
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:02+5:302015-02-13T23:11:02+5:30
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील लाजीरवाण्या पराभवावर प्रदेश भाजपने शुक्रवारी सखोल चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी निवडणूक निकालाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती.

दिल्ली भाजपचे पराभवाबद्दल विचारमंथन प्रदेशाध्यक्ष उपाध्याय यांनी घेतली बैठक
न ी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील लाजीरवाण्या पराभवावर प्रदेश भाजपने शुक्रवारी सखोल चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी निवडणूक निकालाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती.उपाध्याय यांनी ही निवडणूक लढविली नव्हती, तथापि किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार निदर्शने करीत लक्ष वेधले होते. आम्ही का हरलो? याबाबत मी स्थानिक नेत्यांना कारणे मागितली आहेत, असे ते म्हणाले. डिसेंबर २०१३ मध्ये ३१ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या भाजपला यावेळी केवळ तीन जागा जिंकता आल्याने या मानहानीजनक पराभवावर चौफेर टीका होऊ लागली आहे.------------------कोट पराभवाच्या पार्श्वभूमीवर आता पुढील वाटचाल कशी करायची? याबाबत मी प्रदेशनेत्यांची बैठक बोलावली होती. मी त्यांना पराभवांच्या कारणांबाबत माहिती मागितली आहे.-सतीश उपाध्यायदिल्ली भाजपचे अध्यक्ष.