शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

ममता थांबेनात! बंगालच्या बाहेर मोदींना धक्का देण्याची तयारी; चाणक्याला लावले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 06:19 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत अखिलेश यादव यांना फोन केला होता. त्यांच्या सांगण्यानुसार ही बैठक झाली.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर (पीके) आणि भाजप यांच्यातील कटू वादानंतर अशीच स्पर्धा येत्या फेब्रुवारीत उत्तर प्रदेशात बघायला मिळू शकते. उच्च पातळीवरील सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार पी.के. यांची उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी लखनौत दीर्घकाळ बैठक झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत अखिलेश यादव यांना फोन केला होता. त्यांच्या सांगण्यानुसार ही बैठक झाली. पश्चिम बंगालमध्ये पीके यांनी विजयाची व्यूहरचना केली होती. त्यामुळे यादव यांनी भाजपच्या पराभवासाठी पीके यांची मदत घ्यावी, असे बॅनर्जी यांना हवे आहे. २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत पीके हे यादव यांच्या फारच थोडे संपर्कात होते, कारण तेव्हा पीके काँग्रेसला सल्ला देत होते.प्रशांत किशोर यांच्या जवळच्या सूत्रांनी यादव-पीके भेटीवर बोलण्यास नकार दिला. मात्र, यादव यांनी त्यांना योजना तयार करण्यास सांगितल्याचे समजते. अखिलेश यादव यांचा विजय व्हावा अशी बॅनर्जी यांची इच्छा आहे. समाजवादी पक्षाला आशाकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. राष्ट्रीय लोकदल त्याचे प्रमुख जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बळ दाखवत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विरोधक सक्रिय झाल्यामुळे भाजपमध्ये तट पडले आहेत. पक्षाच्या दिल्लीतील श्रेष्ठींच्या पाठिंब्यावर आदित्यनाथ यांचे विरोधक बंडाचा झेंडा उंच करीत असल्याच्या अफवा आहेत. या परिस्थितीमुळे समाजवादी पक्षाला आपण भाजपला पर्याय होऊ शकतो, अशी आशा आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीAkhilesh Yadavअखिलेश यादवPrashant Kishoreप्रशांत किशोरUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ