शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

सरकार व शेतकऱ्यांमध्ये उद्या चर्चा; राजपथवरील परेडची रंगीत तालीम करीत आहेत शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 07:04 IST

चर्चेचा सातवा टप्पा : राजपथवरील परेडची रंगीत तालीम करीत आहेत शेतकरी

विकास झाडेनवी दिल्ली : गणतंत्र दिवशी राजपथवर परेड करण्यासाठी शेतकऱ्यांनी रंगीत तालीम सुरू केली आहे. सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास २६ जानेवारीला राजपथवर ताबा मिळविण्याची रणनीती शेतकरी आखत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांनी मंगळवारी चर्चेची तयारी दर्शविली होती. ही बैठक बुधवारी होईल.शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ३३ दिवस पूर्ण झाले आहेत. दिल्लीतील पाच सीमांवर जवळपास दोन लाख शेतकरी कडाक्याच्या थंडीत कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी जीवाची पर्वा न करता बसले आहेत. 

सरकारने सुचविल्याप्रमाणे शेतकरी नेते चर्चेसाठी तयार आहेत. यासाठी २९ डिसेंबरची वेळ मागीतली होती. परंतु सरकारने ३० ला दुपारी २ वाजता बैठक घेण्याचे मान्य केले आहे. मंत्रीगट आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठकीची ही सातवी फेरी असेल. तयारी करण्यासाठी सरकारने एक दिवस अधिक वेळ मागवून घेतला आहे. शेतकऱ्यांनी मात्र, चर्चेसाठी ४ मुद्दे पाठविले असून त्यावरच चर्चा करावी असा दबाव सरकारवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

कृषी कायद्यांविरोधी लढ्याच्या नेतृत्वासाठी येचुरींचे पवारांना साकडे

केंद्रीय कृषी कायद्यांवरून झालेली कोंडी फोडण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना गळ घातली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनास डाव्या पक्षांची फूस असल्याचा आरोप सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे. महिनाभरापासून सुरू असलेला शेतकऱ्यांचा लढा अद्यापही निर्णायक स्थितीत पोहोचलेला नाही. त्यामुळे अखेरीस येचुरी यांनी सोमवारी पवारांचे निवासस्थान गाठले.

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरही येचुरी यांनी पवारांशी चर्चा केल्याचे समजते. दोन्ही नेत्यांकडून भेटीचा तपशील सांगण्यात आला नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनावर बैठकीत चर्चा झाली. तीन आठवड्यांपूर्वी विरोधी पक्षांनी कृषी कायदे रद्द करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. विशेष म्हणजे काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पवार यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असल्याने येचुरी यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

कृषी कायदे रद्द करण्यासाठी संसदीय मार्गाचा वापर करण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. संसदीय समितीत विधेयकांवर चर्चा न झाल्याने ते रद्द करावे, अशी मागणी विरोधकांनी राष्ट्रपतींकडे केली होती. त्याचाच आग्रह  पवारांनी धरावा, असे साकडे येचुरी यांनी पवारांना घातल्याचे समजते.  

सिंघू सीमेवर मॉल

शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सिंघू सीमेवर एक मॉल सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना इथे प्रत्येक सामान विनामूल्य दिल्या जात आहे. ज्या संस्थेने हा मॉल सुरू केला त्यांचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांना टोकन देतात. दुसऱ्या दिवशी शेतकरी टोकन परत करीत सामान घेऊन जातात. बाहेरच्या व्यक्तींनी इथे येऊन सामान घेऊन जाऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी