शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

मुद्द्याची गोष्ट : चर्चा बुलडोझर आणि एन्काउंटरच्या राजकारणाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 09:55 IST

मुद्द्याची गोष्ट : अनेक दशकांपासून उत्तर प्रदेशात माफियाराज चालविणारा अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या तसेच अतिकचा मुलगा असद व शूटर गुलाम यांचे एन्काउंटर या घटनांनंतर देशभरात योगी सरकारच्या बुलडोझर आणि एन्काउंटरच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे.

राजेंद्र कुमारज्येष्ठ पत्रकार

उत्तर प्रदेशातील माफियाराज संपविण्याठी योगी आदित्यनाथ यांच्या  सरकारने उचललेल्या अशा धोरणाला अनेक जण योग्य ठरवीत आहेत, तर दुसरीकडे टीकादेखील होत आहे. मात्र, या चर्चांमधून काहीही निष्पन्न झाले तरी चांगल्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी राबविण्यात येणारी मोहीम पाहता योगी सरकारसाठी एप्रिल महिना ‘लकी’ ठरत असल्याचे बोलले जात आहे. यूपीमध्ये दहशत पसरविणाऱ्यांबद्दल योगी सरकार कोणत्याही प्रकारे औदार्य दाखविणार नाही, हा संदेश जनमानसात गेला आहे.

जात-धर्म पाहून कठोर कारवाई केली जात नसल्याचा दावाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून अतिकविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, आमदार राजू पाल हत्याप्रकरणातील साक्षीदार उमेश पाल याची २४ फेब्रुवारीला असद आणि त्याच्या साथीदारांनी दिवसाढवळ्या हत्या केली आणि त्यानंतरच अतिकवरील कारवाईवर मोहोर लागली. उमेशच्या साक्षीमुळे अतिक आणि अशरफला कठोर शिक्षा झाली असती. त्यामुळेच अतिकभोवती कारवाईचा फास आवळला.

अतिक आणि टोळी नंबर ‘आयएस २२७’ अतिक हा हायस्कूल फेल. त्याचे वडील हाजी फिरोज टांगा चालवायचे. तेदेखील गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे अतिकही गुन्हेगारीकडे वळला. वयाच्या १९ व्या वर्षी १९७९ मध्ये त्याच्याविरोधात हत्येचा पहिला गुन्हा दाखल झाला. त्याचा अंत झाला त्यावेळी एकूण ११७ गुन्हे दाखल होते. त्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, जमिनी बळकाविणे, इत्यादी गुन्ह्यांचा समावेश आहे. यूपीचा पहिला गँगस्टर असल्याचा मुकुटही त्याच्याच शिरपेचावर होता. १९८६ मध्ये गुंडा ॲक्ट लागू झाला आणि त्याचवर्षी अतिकविरोधात त्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलिसाच्या रेकॉर्डमध्ये अतिकची टोळी ‘आयएस २२७’ या नावाने ओळखली जाते. 

अतिक, अशरफची राजकीय कारकीर्द प्रयागराजमध्ये अतिकचे चर्चे गेल्या २५ वर्षांपासून सुरू आहेत. गुन्हेगारी कारवायानंतर त्याने पाहतापाहता राजकारणात एन्ट्री केली. अतिकने १९८९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. त्यानंतर तो अलाहाबाद शहर येथून १९९१, १९९३, १९९६ आणि २००२ मध्ये निवडणुकीत विजयी झाला. तो पाच वेळा आमदार आणि एक वेळ खासदार झाला. समाजवादी पार्टीच्या तिकिटावर तो १९९६ मध्ये आमदार झाला, तर २००२ मध्ये तो अपना दल (सोनेलाल) मध्ये गेला. त्यावेळी त्याने पक्षाच्या दोन उमेदवारांनाही विजय मिळवून दिला होता. नंतर तो पुन्हा सपामध्ये परतला आणि फुलपूर येथून खासदार झाला. ही जागा एकेकाळी पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची होती. 

मायावतींनी सर्वप्रथम चालविला बुलडोझर माफिया अतिकचे साम्राज्य विशाल होते. त्याच्या अवैध संपत्तीवर सर्वप्रथम बुलडोझर चालविण्याची हिंमत मायावतींनी दाखविली होती. लखनौमध्ये १९९५ मध्ये झालेल्या गेस्ट हाऊस कांडावरून त्या प्रचंड नाराज होत्या. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अतिकवर आरोप होते. २००७ मध्ये त्या पूर्ण बहुमताने मुख्यमंत्री झाल्या, त्यावेळी त्यांनी अतिकभोवती फास आवळला. त्यांनी त्याला तुरुंगात पाठविले आणि त्याची राजकीय कारकीर्द संपविली. म्हणूनच त्यांनी अतिकच्या पत्नीला पक्षात प्रवेश दिल्यावरून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अतिकसारख्या बाहुबलींना राजकीय आश्रय मिळतो, म्हणूनच त्याचे साम्राज्य वाढतच गेले, असे बोलले जात आहे.

यूपीमध्ये निम्म्या आमदारांविरोधात गुन्हे दाखलअतिकच्या हत्येनंतर गुन्हेगार आणि राजकारणाची चर्चा होत आहे. यूपीमध्ये ५१ टक्के आमदारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. ‘एडीआर’च्या अहवालानुसार, १५८ आमदारांविरोधात हत्या, बलात्कार, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अशा प्रकारचे गुन्हे असलेले सर्वाधिक ९० आमदार भाजपमध्ये, तर ४८ आमदार सपामध्ये आहेत. काँग्रेसमध्ये २, तर बसपमध्ये १ आमदार आहे.

ईडीची कारवाईअतिकविरोधात ईडीनेही २०२१ मध्ये कारवाई केली होती. त्याच्या नातेवाइकांवर मारलेल्या छाप्यांमध्ये १०० हून अधिक बेनामी मालमत्ता, २०० हून अधिक बँक खाती तसेच ५० बोगस कंपन्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. यूपी पोलिसांनी अतिकच्या टोळीविरोधात १४४ कारवाया केल्या.

१८३ गुन्हेगारांचे सहा वर्षांत एन्काउंटर योगी सरकारच्या कार्यकाळात एन्काउंटर आणि बुलडोझर कारवाईचे मॉडेल हिट ठरले आहे. पोलिसांनी १८३ गुन्हेगारांचा खात्मा केला आहे. सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. विरोधी पक्षांकडून पोलिसांची कारवाई एकतर्फी असल्याचे आरोप होत आहेत. केवळ अल्पसंख्याकांनाच लक्ष्य करण्यात येत असल्याचाही आरोप होत आहे. मात्र, १८३ गुन्हेगारांपैकी ५७ जण मुस्लीम, तर २६ गुन्हेगार हिंदू होते.

वर्ष     मारले गेलेले गुन्हेगार२०१७     २८ २०१८     ४१ २०१९     ३४ २०२०     २६ २०२१     २६ 

  • २०२२     १४ 

२०२३     १४ 

आधी बुलडोझर, मग राजकीय आश्रयअतिकचे मुलायमसिंह यादव आणि बसपच्या मायावतींसोबत चांगले संबंध निर्माण झाले होते. एकेकाळी अतिकचा प्रचंड विरोध करणाऱ्या मायावतींनी अतिकची पत्नी शाइस्ता परवीन, जी आता फरार आहे आणि मुलाला बसपमध्ये प्रवेश दिला. हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस