‘टीबी’चा राज्याला विळखा
By Admin | Updated: November 30, 2014 01:44 IST2014-11-30T01:44:14+5:302014-11-30T01:44:14+5:30
क्षयरोगाने (एमडीआर-टीबी) देशात सर्वाधिक विळखा महाराष्ट्राला घातल्याचा धक्कादायक अहवाल केंद्रीय क्षयरोग विभागाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला दिला आहे.

‘टीबी’चा राज्याला विळखा
रघुनाथ पांडे ल्ल नवी दिल्ली
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ क्षयाचा (टीबी) उपचार घेऊनही त्या औषधांनाही गुंगारा देणा:या जैवप्रतिरोधक क्षयरोगाने (एमडीआर-टीबी) देशात सर्वाधिक विळखा महाराष्ट्राला घातल्याचा धक्कादायक अहवाल केंद्रीय क्षयरोग विभागाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला दिला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी रुग्णसंख्या वाढतच असल्याचेही नोंदविण्यात आलेले आहे.
एमडीआर-टीबी व क्षयाने मागील साडेतीन वर्षात राज्यात 22 हजार मृत्यू झाले असून, तीस वर्षाआतील तरुणांचे प्रमाण जवळपास निम्मे आहे. चालू वर्षाच्या सप्टेंबर्पयत राज्यात 68 हजार 751 क्षयरुग्णांवर उपचार सुरू झाले असून, यातील साडेतीन हजारांवर रुग्ण एमडीआरचे आहेत. मुंबई, ठाणो सर्वाधिक व त्याखालोखाल पुणो, औरंगाबाद, नागपूर या महानगरांसह 23 जिल्ह्यांमध्ये एमडीआर-टीबी पसरत असून, दररोज रुग्णांची होणारी वाढ आरोग्य विभागाची झोप उडवणारी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या अहवालात एमडीआर-टीबीमध्ये भारत जगात 14व्या स्थानावर असून, त्यानंतर केंद्रीय क्षयरोग विभागाने दिलेल्या अहवालानुसार भारतात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटले की, औषधांची मात्र उपलब्ध असून, उपाय योजले जातील.
हाती आलेल्या अहवालातील नोंदीनुसार, क्षय व प्रतिरोधक क्षय अशा दोन श्रेण्यांमध्ये क्षयाची मांडणी होत असून, महाराष्ट्र एचआयव्ही टीबीसाठी अतिजोखमीच्या असलेल्या देशातील नऊ राज्यांपैकी एक असून, आधीच प्रथम क्रमांकावर असताना एमडीआर-टीबीने (मल्टीड्रग रेजिटंन्स टय़ुबोरोक्युलॅसिस) वैद्यकीय यंत्रणोपुढे आव्हान उभे केले आहे. गेल्या वर्षी 1 लाख 37,237 क्षयरुग्ण होते. त्यापैकी 4,98क् एमडीआर-टीबी होते. यंदाच्या पहिल्याच सहा महिन्यांत ही संख्या 3,4क्9 झाली आहे. महाराष्ट्रानंतर राजस्थान (2,131), गुजरात (1,971), आंध्र प्रदेश (1893), उत्तर प्रदेश (1877) अशी रुग्णसंख्या आहे.
अशी आहे स्थिती?
मागील तीन वर्षात 4 लाख 77,314 क्षयाचे तर 13 हजार 648 रूग्ण एमडीआर-टीबीचे नोंद झाले आहेत. राज्यात दरमहा 5क् हजारपेक्षा जास्त संशयित क्षयरोग रु ग्णांची थुंकी नमुन्याची तपासणी होते. 8 हजारपेक्षा जास्त क्षय रु ग्णांवर उपचार सुरू करण्यात येतात. वर्षभरात सुमारे 1.3 लाखापेक्षा जास्त रु ग्ण उपचार घेतात.
च्यात मुख्यत: 75 टक्के रु ग्णांमध्ये फुप्फुसांना बाधा होत असते. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ क्षयाचा उपचार घेतल्यावरही तो बरा होत नाही, तेव्हा त्याचे रूपांतर एमडीआर-टीबीमध्ये होते.
च्क्षय रोग हा जीवाणूजन्य आजार असून, मायकोबॅक्टेरिया या प्रकारच्या जीवाणूंमुळे होतो. मुख्यत्वे मायकोबॅक्टेरियम टय़ुबोरोक्युलॅसिस प्रकारामुळे मानवामध्ये क्षयरोग होतो.