शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

Amritpal Singh : गुरुद्वारामध्ये प्रवचन, पोलीस सतर्क, रोडेगावात कारवाई; असा अमृतपाल सापडला कायद्याच्या कचाट्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 12:56 IST

Amritpal Singh : फरारी अमृतपाल सिंगला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला मोगा येथील रोडेगाव येथील गुरुद्वारातून अटक करण्यात आली असून, यादरम्यान पोलिसांनी बरीच खबरदारी घेतली होती.

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग आता पोलिसांच्या ताब्यात आहे. पंजाबमधील मोगा येथील रोडेवाल गावात असलेल्या गुरुद्वारातून त्याला अटक करण्यात आली आहे.गेल्या ३६ दिवसांपासून पोलिसांना चकवा देणारा ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख शनिवारी रात्रीच गुरुद्वारमध्ये पोहचला. तेथे त्याने ग्रंथीशी बोलून त्याला शरण जायचे असल्याचे सांगितले. याची माहिती ग्रंथींनी पोलिसांना दिली. अमृतपाल गुरुद्वारामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळताच संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली. रोडेगावमध्ये कारवाईचे नियोजन करण्यात आले. यादरम्यान गुरुद्वारा साहिबच्या प्रतिष्ठेची काळजी घेतली जाईल याचीही काळजी घेण्यात आली. पूर्ण खबरदारी घेऊन आज सकाळी ६.४५ वाजता पोलीस फौजफाटा रोडेगाव येथे पोहोचला. तेथून अमृतपालला अटक करण्यात आली.

Poonch Terror Attack : दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर केला होता स्टिकी बॉम्बने हल्ला, AK-47 मधून केले 36 राउंड फायर!

अमृतपालला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला भटिंडा विमानतळावर नेले. विमानतळावरच त्याचे मेडिकल करण्यात आले. यानंतर पंजाब पोलिसांनी अमृतपालला ताब्यात घेतले आणि कडेकोट बंदोबस्तात दिब्रुगडला रवाना झाले. यादरम्यान त्यांच्यासोबत दिब्रुगडपर्यंत एक डॉक्टरही जाणार आहे. अटक करण्यापूर्वी अमृतपाल सिंगने प्रवचनाच्या वेळीही लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला. 

अमृतपाल सिंग याला ३६ दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. अजनाळा घटनेनंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्यावर एनएसएही लादण्यात आले होते. पंजाब पोलिसांनी अमृतपालला अटक केल्याचे ट्विट केले आहे, त्याला पंजाबमधील मोगा येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणतीही फेक न्यूज शेअर करू नका असंही सांगितले.

अमृतपालने ज्या ठिकाणी आत्मसमर्पण केले ते जनरल सिंग भिंद्रनवाले यांचे गाव आहे. यासोबतच त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो गुरुद्वारामध्ये प्रचार करत आहे. पण फ्रेममध्ये तो एकटाच दिसतो, त्याच्या आजूबाजूला कुणीच नसतं. खरं तर, यावर्षी 23 फेब्रुवारी रोजी अमृतपाल सिंह यांनी आपल्या समर्थकांसह अमृतसरमधील अजनाळा पोलिस स्टेशनवर एका सहकाऱ्याच्या सुटकेची मागणी करत हल्ला केला होता. या प्रकरणावरून पंजाब पोलीस आणि सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.

अमृतपालने ज्या ठिकाणी आत्मसमर्पण केले ते जनरल सिंग भिंद्रनवाले यांचे गाव आहे. यासोबतच त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो गुरुद्वारामध्ये बोलत आहे. पण फ्रेममध्ये तो एकटाच दिसतो, त्याच्या आजूबाजूला कुणीच दिस नाही. यावर्षी २३ फेब्रुवारी रोजी अमृतपाल सिंह याने  आपल्या समर्थकांसह अमृतसरमधील अजनाळा पोलिस स्टेशनवर एका सहकाऱ्याच्या सुटकेची मागणी करत हल्ला केला होता. या प्रकरणावरून पंजाब पोलीस आणि सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.

टॅग्स :PunjabपंजाबPoliceपोलिस