शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
गडचिरोलीत आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
3
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
4
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
5
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
6
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
7
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
8
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
9
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
10
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
11
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
12
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
13
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
15
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
16
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
17
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
18
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
19
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
20
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली

बिहारमध्ये जागावाटपावरून रालोआतील पक्षांत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 14:49 IST

मांझी म्हणाले, आम्ही गरीब आहोत, म्हणून जे मिळाले त्यावर समाधानी; काँग्रेसच्या उमेदवारांची यादी तयार; जागावाटप लवकर होण्याची शक्यता

एस. पी. सिन्हा -

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी रालोआमध्ये जागावाटप निश्चित झाले असले तरी काही घटक पक्षांत यावरून असंतोष आहे. विशेषत: हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (हम) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी हलक्या सुरात ही नाराजी व्यक्त केली असून, राष्ट्रीय लोक मोर्चाचे (रालोमो) नेते खा. उपेंद्र कुशवाह यांनीही जागावाटपाच्या सूत्राबाबत समाधानी नसल्याचे स्पष्ट केले आहे. या दोन्ही पक्षांना प्रत्येकी सहा जागा देण्यात आल्या आहेत. 

मी पंतप्रधान मोदींसोबतच...या निवडणुकीत पक्षासाठी १५ जागा मागितल्या होत्या. परंतु, फक्त ६ जागा देण्यात आल्या. असे असले तरी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पूर्णपणे आहोत व निर्णयावर समाधानी आहेत, असे मांझी यांनी म्हटले आहे. ‘आम्ही गरीब आहोत, म्हणून जे मिळाले त्यावर समाधानी आहोत’, असे ते म्हणाले. सर्व जागा जिंकून आपण रालोआला बळ देऊ, असे त्यांनी नमूद केले.रालोआने २४३ विधानसभा जागांसाठी जागावाटप जाहीर केले. यात भाजप व जदयू प्रत्येकी १०१ जागा देण्यात आल्या आहेत.

भाजप उमेदवारांचीआज घोषणा? मतदारसंघांचे वाटप झाल्यानंतर आता उमेदवारांची घोषणा कधी होते याकडे राज्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष आहे. सध्या ही नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आली असून, तेथून मंजुरी मिळताच उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. ही यादी आज, मंगळवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. 

जागांच्या अदलाबदलीवर मंथन : भाजप व जदयू यांनी काही जागांवर अदलाबदली करता येईल का यावर मंथन सुरू आहे. असे बदल करून जागा छोट्या पक्षांना सोडण्याचा दोन्ही प्रमुख पक्षांचा विचार आहे. यासाठी झा यांच्या निवासस्थानी बैठक झाली. 

राजकीय हालचालींना वेगकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह १६ ऑक्टोबरपासून बिहार दौऱ्यावर असतील. या काळात उमेदवारी अर्ज भरण्यासोबतच प्रचाराला वेग येईल. इंडिया आघाडीच्या दोन नेत्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. राजदच्या मोहनियाच्या आमदार संगीता कुमार व बिक्रमचे दोन वेळा आमदार राहिलेले काँग्रेस नेते सिद्धार्थ सौरव यांचा यात समावेश आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची यादी तयार, महाआघाडीचे जागावाटप दोन दिवसांत झाले नाही तर पक्ष पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता

एसबीएसपीची बंडखोरीउत्तर प्रदेशात रालोआचा सहकारी पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीने बंडखोरी करीत १५३ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. या पक्षाला भाजपप्रणीत रालोआने एकही जागा दिलेली नाही.

अरुण सिन्हा यांची माघारभाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्यापूर्वीच नाराजीतून कुम्हरारमधून पाच वेळा आमदार राहिलेले अरुणकुमार सिन्हा यांनी निवडणूक लढवायची नाही, अशी घोषणा केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar NDA Seat Sharing: Discontent Brews Among Alliance Partners

Web Summary : Unease simmers within Bihar's NDA over seat allocation for elections. HAM and RLSP express dissatisfaction despite seat allotments. BJP and JDU consider seat swaps for smaller parties. Candidate lists are expected soon as campaigning intensifies. Internal rebellion and candidate withdrawals add to the pre-election drama.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५National Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपा