नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात जातीय तणाव कायम राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सरकार स्पष्ट बहुमताने सत्तेत येईल, या भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कथित विधानावरून वादंग उठले असताना संबंधित वृत्तवाहिनीने याबाबत खुलासा जारी केला आहे़ भाजपाने कधीही सांप्रदायिक तणावाचा आधार घेऊन निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न केले नाहीत, असे शहा यांनी मुलाखतीत सांगितले होते, असे खुलाशात म्हटले आहे़महाराष्ट्र आणि हरियाणातही विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत; मात्र या राज्यांत जातीय तणाव नाही़ उत्तर प्रदेशातच जातीय तणाव का? असा सवाल उपस्थित करीत, हा तणाव असाच कायम राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सरकार स्पष्ट बहुमताने सत्तेत येईल, असे शहा म्हणाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भाजपाध्यक्षांच्या विधानावर खुलासा
By admin | Updated: September 8, 2014 02:25 IST