मुस्लिमांच्या भारतप्रवेशाला मज्जाव करा - योगी आदित्यनाथ

By Admin | Updated: January 31, 2017 13:50 IST2017-01-31T13:45:49+5:302017-01-31T13:50:09+5:30

सात मुस्लिम बहुल देशांतील नागरिकांना अमेरिका प्रवेश बंदी निर्णयाचे भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ कौतुक केले आहे.

Disallow Muslims from entering India - Yogi Adityanath | मुस्लिमांच्या भारतप्रवेशाला मज्जाव करा - योगी आदित्यनाथ

मुस्लिमांच्या भारतप्रवेशाला मज्जाव करा - योगी आदित्यनाथ

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 31 - सात मुस्लिम बहुल देशांतील नागरिकांना अमेरिका प्रवेश बंदीचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेवर चहुबाजूनंही टीकेची झोड उठत असताना, भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. 
(VIDEO : नरेंद्र मोदींच्या दबावामुळेच नजरकैद - हाफिज सईद)
 
दहशतवाद रोखण्यासाठी आपल्या देशातही अशाप्रकारची कारवाई होणे गरजेचे आहे, असे म्हणत त्यांनी ट्रम्प यांचे कौतुक केले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागातून हिंदूच्या पलायनाचा दावाही सत्य असल्याचे सांगत लवकरच हा परिसरदेखील आणि एक काश्मीर बनले, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. 
(26/11 चा सूत्रधार हाफिझ सईद नजरकैदेत)
 
ज्याप्रमाणे काश्मिरी पंडितांना खोरे सोडण्यासाठी भाग पाडलं जात आहे, त्याचप्रमाणे पश्चिम उत्तर प्रदेशातील हिंदूंमध्येही दहशत पसरवली जात आहे, असा आरोपही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केला. मात्र, आम्ही या परिसराला दुसरे काश्मीर बनू देणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. 

Web Title: Disallow Muslims from entering India - Yogi Adityanath