वेळापत्रकाअभावी धावणार्या मिनीबसमुळे कुंभोजमधील प्रवाशांची गैरसोय
By Admin | Updated: May 12, 2014 22:59 IST2014-05-12T22:59:19+5:302014-05-12T22:59:19+5:30
मनसेची इचलकरंजी आगाराकडे तक्रार

वेळापत्रकाअभावी धावणार्या मिनीबसमुळे कुंभोजमधील प्रवाशांची गैरसोय
म सेची इचलकरंजी आगाराकडे तक्रारकुंभोज : इचलकरंजी-कंुभोज मार्गावर वेळी-अवेळी धावणार्या एस.टी. महामंडळाच्या मिनी बसेसमुळे नागरिकांची गैरसोय, तर मोबाईलवर बोलत बसेस चालवणार्या चालकांच्या बेपर्वाईमुळे प्रवाशांची सुरक्षा बेभरवशाची बनली आहे. याबाबत येथील मनसे शाखेने इचलकरंजी आगाराकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.इचलकरंजी-कुंभोज मार्गावरील मिनीबस सेवेमुळे नेज, शिवपुरी, बाहुबली, कुंभोज येथील नागरिकांची चांगली सोय झाली. तथापि, या मार्गावर धावणार्या बस गाड्यांचे वेळापत्रक कोठेही न लावल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते. बसगाड्यांचे चालक मोबाईलवर बोलत गाड्या चालवित असल्याचे प्रवाशांनी मनसे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रवाशांची सुरक्षा चालकांच्या बेपर्वाईमुळे धोक्यात आल्याने मनसेचे अध्यक्ष विनायक कोळी, उपाध्यक्ष शंकर माने, सुदर्शन चौगुले, प्रमोद सपकाळ, रतन माळी, सचिन पाटील आदी कार्यकर्त्यांनी इचलकरंजी एस. टी. आगाराकडे तक्रार केली आहे. वार्ताहर