शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

राम मंदिराच्या उभारणीसाठी दिग्विजय सिंहांचा पुढाकार; 1,11,111 रुपयांची दिली देणगी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 5:01 PM

Digvijay Singh : काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनीही भगवान राम यांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी योगदान दिल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देदिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला धनादेश (चेक) पाठविला आहे.

भोपाळ : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. देशाच्या विविध भागातून राम मंदिर बांधण्यासाठी लोक देणगी देत ​​आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनीही भगवान राम यांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी योगदान दिल्याचे वृत्त आहे. दिग्विजय सिंह यांनी 1 लाख 11 हजार 111 रुपये देणगी दिली आहे.

दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला धनादेश (चेक) पाठविला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले आहे. यामध्ये राम मंदिर बांधण्यासाठी देशातील जनतेकडून देणगी गोळा करण्याचे काम सौहार्दपूर्ण पद्धतीने व्हावे, असे आवाहन दिग्विजय सिंह यांनी केले आहे. तसेच, त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या जुन्या देणगीचा अहवाल जनतेसमोर ठेवण्याची मागणी केली आहे.

याआधी राम मंदिर बांधण्यासाठी 100 कोटी रुपयांची देणगी मिळाल्याची बातमी समोर आली होती. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी मीडियाला माहिती देताना सांगितले की, दोन दिवसांत मोठी देणगी जमा झाली आहे, एवढी माहिती आम्हाला मिळाली आहे. या देणगीमध्ये उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्याचे माजी आमदार सुरेंद्र बहादुर सिंह यांचे सर्वाधिक योगदान आहे. 

सुरेंद्र बहादुर सिंह यांनी विहिंपचे उपाध्यक्ष आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे  सरचिटणीस चंपत राय यांना 1,11,11,111 रुपयांचा धनादेश दिला. दरम्यान, आपल्या माहितीसाठी अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या आंदोलनात  विश्व हिंदू परिषद आघाडीवर राहिली आहे.

अयोध्येतील राम मंदिरासाठी मुस्लिमांचाही पुढाकारअयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. या मोहिमेमध्ये मुस्लीम देखील मागे राहीलेले नाहीत. अयोध्येच्या पवित्र नगरीला धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतिक बनविण्यासाठी वासी हैदर यांच्याकडून 12 हजार, तर शाह बानो यांच्याकडून 11 हजार रुपयांची वर्गणी देण्यात आली आहे.  बाबरी मशिदीच्या ऐतिहासिक निकालानंतर या बाबरीची बाजू लढवणारे वकील इक्बाल अन्सारी यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठीच्या महाअभियानाचे स्वागत केले आहे. "राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिमांनी पुढाकार घेऊन दान केले तर नक्कीच हे दोन्ही धर्मातील एकोपा वाढविण्याचे संपूर्ण देशात प्रतिक ठरेल", असे अन्सारी म्हणाले.  

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर