शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

दिग्विजय यांनी ओळखली मोदी सरकारची 'खेळी'; पेट्रोल दराबाबत वर्तवलं भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 10:42 IST

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. दिग्विजय सिंह 6 महिन्यांच्या नर्मदा परिक्रमेवरून परतल्यानंतर त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

भोपाळ- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. दिग्विजय सिंह 6 महिन्यांच्या नर्मदा परिक्रमेवरून परतल्यानंतर त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. ट्विट करत ते म्हणाले, देशभरात पेट्रोल-डिझेलची भाव भडकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत देशभरात भाजपाचं राज्य असेलली सरकारे बॅकफूटवर गेली आहेत.2014 ते 2018 दरम्यान मोदी सरकारनं मोठ्या प्रमाणात एक्साइज ड्युटी वाढवली आहे. त्यामुळे मोदी सरकार 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरची एक्साइज ड्युटी 18.28 रुपयांनी, तर डिझेलवरची एक्साइज ड्युटी 19.87 रुपये कमी करून मतदारांना आकर्षित करू शकते. तसेच पायाभूत सुविधांच्या विकासाच्या नावाखाली 8 रुपये प्रतिलिटर सेस वेगळा लावण्यात येत आहे, असंही दिग्विजय सिंह म्हणाले आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी दिग्विजय सिंह यांनी जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये शिवी लिहिण्यात आली होती. दिग्विजय सिंह यांनी पक्षाला अडचणीत आणण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते अडचणीत आले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी दिग्विजय सिंह यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा उल्लेख भारतव्याप्त काश्मीर असा केला होता. 8 जुलै रोजी दहशतवादी बु-हान वानीला सुरक्षा जवानांनी ठार केल्याने आधीच काश्मीर खो-यात वातावरण तापलं असताना दिग्विजय सिंह यांनी हे वक्तव्य केलं होतं.2013मध्ये आपल्याच पक्षाच्या महिला खासदारा मीनाक्षी नटराजन यांचे वर्णन '१०० टंच माल' असे वर्ण केल्याने दिग्विजय सिंह यांच्यावर टीका झाली होती. काँग्रेसच्या खासदार मीनाक्षी नटराजन यांच्या मंदसौर मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत दिग्विजय सिंह बोलत होते. आपल्याला खरं सोनं असं म्हणायचं होतं अशी सारवासावर त्यांनी केली होती. तसंच चुकीचं वार्तांकन करणा-या टीव्ही चॅनेल्सविरोधात कारवाईची धमकी दिली होती.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंह