शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल व्यवहारांमध्ये 80 टक्क्यांची वाढ अपेक्षित, 2017-18 मध्ये पोहोचणार 1800 कोटीपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 10:08 IST

धिकृत आकडेवारीनुसार देशात वर्ष 2017-18 मध्ये डिजिटल व्यवहारात 80 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारकडूनही डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचा प्रयत्न झाला. अधिकृत आकडेवारीनुसार देशात वर्ष 2017-18 मध्ये डिजिटल व्यवहारात 80 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेकांचा डिजिटल व्यवहार करण्याकडे कल वाढला. केंद्र सरकारकडूनही डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचा प्रयत्न झाला. डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या सरकारच्या निर्णयला यश मिळत असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार देशात वर्ष 2017-18 मध्ये डिजिटल व्यवहारात 80 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. डिजिटल व्यवहार 1800 कोटी रूपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा केली जाते आहे. डिजिटल व्यवहार वाढण्यामागे नोटाबंदी हे प्रमुख कारण समजलं जातं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

यावर्षी ऑक्टोबरपर्यंत एक हजार कोटींपर्यंत डिजिटल व्यवहार पोहोचला होता. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये झालेल्या डिजिटल व्यवहाराइतकी ही रक्कम आहे. सूचना मंत्रालयानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात 136-138 कोटी रूपयांचे डिजिटल व्यवहार झाले आहेत.

मार्च-एप्रिल महिन्यात नोटाबंदीमुळे निर्माण झालेली नोटांची टंचाई हळूहळू कमी होताना दिसते आहे. तरीही डिजिटल व्यवहारात वाढ दिसून आली होती. या दोन महिन्यांत 156 कोटी रूपयांचा व्यवहार झाला होता. त्यानंतर 136-138 कोटी रूपयांचे व्यवहार झाले.

हा अहवाल संसदेच्या वित्तीय स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केल्यापासून दैनंदिन व्यवहारात डिजिटल पेमेंटमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये यूपीआय-भीम, आयएमपीएस, एम वॉलेट किंवा डेबिट कार्ड यांचा वापर आधीपेक्षा जास्त होताना दिसत आहे. देशात 118 कोटी मोबाइल, इतकेच आधार क्रमांक आणि 31 कोटी जनधन खाती असल्याचं, या अहवालात म्हटलं आहे.ई-फायलिंग करणाऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. जीएसटीअंतर्गत 72 लाख व्यापाऱ्यांनी ऑनलाईन फायलिंग केले. त्याचबरोबर 2015-16 च्या तुलनेत 2016-17 मध्ये इनकम टॅक्सचे ई-फायलिंग करणाऱ्यांच्या संख्येत 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आधारच्या माध्यमातून सरकारने जवळपास 9 अब्ज डॉलरची बचत केल्याचं या योजनेचे माजी प्रमुख नंदन नीलकेणी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. सरकारनेही  2016-17 मध्ये 57 हजार 29 कोटी रूपयांची बचत झाल्याचं म्हटलं होते. ई-टोल पेमेंटमध्येही मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. 

जानेवारी 2016 मध्ये ई-टोल 88 कोटी रूपये इतके होते. तर ऑगस्ट 2017 मध्ये ते 275 कोटी रूपयेपर्यंत पोहोचले होते. पण, सप्टेंबर 2017 पर्यंत टॅग्जची संख्या 6 लाखांपर्यंतच मर्यादित राहिली. सरकारी अॅप भीम-यूपीआयच्या माध्यमातून व्यवहारातंही वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये 101 कोटी रूपये होते. तेच ऑक्टोबर 2017 मध्ये 7057 कोटीपर्यंत पोहोचले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNote Banनोटाबंदीdigitalडिजिटल