जमाना डिजिटलचा : लॅपटॉप, माऊस, हेडफोन झाली निवडणूक चिन्हे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 07:10 AM2019-04-01T07:10:42+5:302019-04-01T07:11:01+5:30

जमाना डिजिटलचा : अपक्ष, नव्या पक्षांसाठी १९८ पर्याय उपलब्ध

Digital time: Laptop, mouse, headphone, signs of election signs! | जमाना डिजिटलचा : लॅपटॉप, माऊस, हेडफोन झाली निवडणूक चिन्हे!

जमाना डिजिटलचा : लॅपटॉप, माऊस, हेडफोन झाली निवडणूक चिन्हे!

Next

मुंबई : अपक्ष उमेदवार आणि नव्या पक्षांच्या निवडणूक चिन्हांवर असलेला ग्रामीण जीवनाचा पगडा यंदा दूर झाला असून निवडणूक आयोगाने तब्बल १९८ पर्याय उपलब्ध करून दिली आहेत. त्यात डिजिटल साधनांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा उखळ, धान्य पाखडण्याचे सूप, दळणाच्या जात्यापासून लॅपटॉप, पेनड्राइव्ह, माऊस, हेडफोन, रोबोट आदी चिन्ह म्हणून उपलब्ध असणार आहेत.

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांच्या उमेदवारांव्यतिरिक्त अपक्ष तसेच अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षाच्या अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह देण्यात येते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने ८७ मुक्त चिन्हे निश्चित
केली होती. यंदा यात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसारख्या राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांसाठी चिन्हे राखीव चिन्हे वगळून तब्बल

१९८ मुक्त चिन्हे अपक्षांसाठी उपलब्ध असणार आहेत.
दैनंदिन वापरातील वस्तू, व्यक्तिगत तसेच दळणवळणाची साधने, फळे, भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तू, क्रीडा साहित्य, कृषी- बांधकाम क्षेत्र, अत्याधुनिक संगणक युगातील साधने आदी विविध क्षेत्रातील साधनांचा मुक्त चिन्हांमध्ये समावेश करुन आयोगाने सर्वसमावेशकता जपली आहे. ऊस उत्पादक शेतकरी, नारळाची बाग, डिजेल पंप, ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, शेतीच्या मशागतीसाठीचे टीलर, विहीर अशी चिन्हे यंदाही असणार आहेत.
हेल्मेटद्वारे सुरक्षेचा संदेश
मुक्त चिन्हांमध्ये हेल्मेटचा समावेश करुन आयोगाने एक प्रकारे दुचाकी चालकाच्या जीविताच्या रक्षणासाठी संदेशच दिला आहे.

स्वयंपाकघरच अवतरले

गॅस सिलिंडर, गॅस शेगडी, रेफ्रीजरेटर, मिक्सर, प्रेशर कुकर, हंडी, कढई, तळण्याची कढई (फ्रार्इंग पॅन), काचेचा ग्लास, ट्रे, कपबशी, चहाची गाळणी, उखळ आणि खलबत्ता, शिमला मिर्ची, फूलकोबी, हिरवी मिरची, भेंडी, आले, मटार, फळांची टोपली, सफरचंद, द्राक्षे, नासपती (पीअर्स), फणस, अननस, अक्रोड, बिस्कीट, ब्रेड, केक आदींच्या रुपात मुक्त चिन्हे ठरविताना आयोगाने स्वयंपाकघराला मान दिला आहे.

Web Title: Digital time: Laptop, mouse, headphone, signs of election signs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.