शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधारशिवाय डिजिटल अर्थव्यवस्था कोलमडणार; कंपन्यांना नवा कायदा हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 20:03 IST

बेंगळुरु : आधार क्रमांकाच्या वापरावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वसामान्यांसाठी दिलासादायक असला तरीही खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. भाड्याने बाईक देणाऱ्या कंपन्या, कर्ज पुरविणाऱ्या कंपन्यांची ग्राहकाच्या व्हेरिफिकेशनसाठी आधारच्या वापराचा नवा कायदा करण्याची मागणी करू लागल्या आहेत. सरकारच्या मागे लागणारी लॉबी इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियामध्ये सहभागी असलेल्या पेमेंट्स ...

बेंगळुरु : आधार क्रमांकाच्या वापरावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वसामान्यांसाठी दिलासादायक असला तरीही खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. भाड्याने बाईक देणाऱ्या कंपन्या, कर्ज पुरविणाऱ्या कंपन्यांची ग्राहकाच्या व्हेरिफिकेशनसाठी आधारच्या वापराचा नवा कायदा करण्याची मागणी करू लागल्या आहेत. 

सरकारच्या मागे लागणारी लॉबी इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियामध्ये सहभागी असलेल्या पेमेंट्स काऊंन्सिलने (पीसीआई) आज आपल्या सदस्यांची तातडीची बैठक घेतली. यामध्ये केंद्र सरकारला असा कायदा का गरजेचा आहे, याबाबतचे प्रेझेंटेशन दाखविण्याबाबत चर्चा झाल्याचे अध्यक्षांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. 

नवा कायदा आणण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे अधिकारी आणि मालक यावर चर्चा करत आहेत. अर्थ मंत्रालायाच्या सुत्रांनी सांगितले की, या उद्योजकांच्या गटाने अनौपचारिक चर्चा केली आहे आणि आम्हाला या अडचणीबाबत माहिती आहे. हा मुद्दा सोडविण्यात आला नाही तर आम्ही डिजिटल पेमेंटच्या जगात काही वर्षे मागे जाणार आहोत. 

भाड्याने बाईक देणारी कंपनी मेट्रो बाइक्सने आपल्या ग्राहकांचे व्हेरिफिकेशन आधारवर करण्याची यंत्रणा राबविली होती. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे कंपनी अडचणीत आली आहे. कारण कोणत्याही आरटीओकडे या ग्राहकांचा ऑनलाईन माहिती नाही. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सवरून त्यांचे व्हेरिफिकेशन करणे कठीण बननार आहे. यामुळे कंपनीला प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. यामुळे खर्च वाढीबरोबरच जोखीमही वाढणार आहे. 

या प्रमाणेच काही डिजिटल पेमेंट किंवा अन्य काही सुविधा या यापूर्वी आधारवर केल्या जात होत्या. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे यावरही परिणाम होणार आहे. खासगी कंपन्या पॅनकार्ड ऐवजी आधारकार्ड द्वारे आपल्या ग्राहकाची ओळख पटविण्याचे काम करत होत्या. कर्ज देतानाही काही बँका, कंपन्या आधारचा वापर करत होत्या. मात्र, त्यांच्यावरही आता निर्बंध आले आहेत. 

यूआईडीएआईचे माजी टेक्नॉलॉजी प्रमुख श्रीकांत नाधामुनी  यांनी सांगितले की, यामुळे नव्या तंत्रज्ञानाच्या शोधावरही परिणाम होणार आहे. केवाइसीसाठी खर्च वाढणार आहे. व्यवस्थेवरून विश्वास उडेल आणि व्यवहाराला आणखी पैसे मोजावे लागतील. जीडीपीमध्ये 80 टक्क्यांची हिस्सेदारी ही खासगी कंपन्यांची आहे. यामध्ये छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. ज्या आपल्या अर्थव्यवस्थेच्या कणा आहेत. त्यांना ग्राहकांची ओळख पटविण्यासाठी आधारचा अधिकार मिळायला हवा. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालयbusinessव्यवसायCentral Governmentकेंद्र सरकार