पाकिस्तानी बोटीवरील वक्तव्यावरून डीआयजींचा माफीनामा
By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:42+5:302015-02-21T00:49:42+5:30
नवी दिल्ली : ३१ डिसेंबर २०१४ च्या रात्री पाकिस्तानमधून आलेली संशयित दहशतवाद्यांची बोट गुजरातजवळच्या समुद्रात उडविण्याचे आदेश दिल्याबद्दलच्या आपल्या वक्तव्यावर तटरक्षक दलाचे उप महानिरीक्षक बी. के. लोशाली यांनी शुक्रवारी माफी मागितली आहे.

पाकिस्तानी बोटीवरील वक्तव्यावरून डीआयजींचा माफीनामा
न ी दिल्ली : ३१ डिसेंबर २०१४ च्या रात्री पाकिस्तानमधून आलेली संशयित दहशतवाद्यांची बोट गुजरातजवळच्या समुद्रात उडविण्याचे आदेश दिल्याबद्दलच्या आपल्या वक्तव्यावर तटरक्षक दलाचे उप महानिरीक्षक बी. के. लोशाली यांनी शुक्रवारी माफी मागितली आहे.पाकमधून आलेल्या या बोटीत दहशतवादी होते आणि ही बोट भारतीत सागरी हद्दीत आल्यावर तिला उडविण्याचे आदेश आपणच दिले होते, असे वक्तव्य करून लोशाली यांनी सरकारला चांगलेच अडचणीत आणले होते; परंतु ही बोट उडविण्याचे आदेश लोशाली किंवा अन्य कुणीही दिलेले नसून दहशतवाद्यांनीच पकडले जाण्याच्या भीतीने बोटीसह स्वत:ला उडविल्याचे वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले होते. आपल्या वक्तव्यानंतर लोशाली यांनी तटरक्षक दलाच्या मुख्यालयाला पत्र लिहून आपल्या आचरणाबद्दल माफी मागितली आहे.दरम्यान, लोशाली यांनी मागितलेली माफी समाधानकारक नसल्याचे तटरक्षक दलाच्या मुख्यालयाला आढळून आले आहे आणि याबाबत विस्तृत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्र सरकारने याआधीच लोशाली यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे, हे येथे उल्लेखनीय. (लोकमत न्यूज नेटवर्क)