लक्ष्यपूर्तीचे अवघड आव्हान करमणूक कर वसुली: नागपूर विभाग

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:02+5:302015-02-11T00:33:02+5:30

नागपूर: नागपूर विभागाला करमणूक कर वसुलीसाठी दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी यंत्रणेची चांगलीच पायपीट सुरू असून एप्रिल ते डिसेंबर २०१४ या काळात ६४ टक्के वसुलीच शक्य झाली आहे. नागपूर शहरात कर वसुलीची मोठी समस्या यंत्रणेपुढे आहे.

Difficult to meet the challenge: Entertainment Tax Recovery: Nagpur Division | लक्ष्यपूर्तीचे अवघड आव्हान करमणूक कर वसुली: नागपूर विभाग

लक्ष्यपूर्तीचे अवघड आव्हान करमणूक कर वसुली: नागपूर विभाग

गपूर: नागपूर विभागाला करमणूक कर वसुलीसाठी दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी यंत्रणेची चांगलीच पायपीट सुरू असून एप्रिल ते डिसेंबर २०१४ या काळात ६४ टक्के वसुलीच शक्य झाली आहे. नागपूर शहरात कर वसुलीची मोठी समस्या यंत्रणेपुढे आहे.
२०१४-१५ या वर्षासाठी नागपूर विभागाला एकूण ३०.३० कोटी रुपये कर वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून देण्यात आले होते. एप्रिल ते डिसेंबर २०१४ या ९ महिन्यात १९.५८ कोटी (६४ टक्के) रक्कम वसूल होऊ शकली. यात वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्याची वाटचाल लक्ष्यपूर्तीकडे सुरू असली तरी ज्या जिल्ह्यापासून सर्वाधिक महसूल अपेक्षित आहे त्या नागपूर जिल्ह्याची आणि गडचिरोली जिल्ह्याची अवस्था समाधानकारक नाही. वर्धा जिल्ह्याला १ कोटी ९५ लाखाचे लक्ष्य देण्यात आले होते त्यापैकी ८२ लाख रुपये डिसेेंबरपर्यंत वसुल झाले. भंडाऱ्यात १ कोटी २५ लाख रुपयांपैकी ९०.१३ लाख, गोंदिया जिल्ह्यात १ कोटी १० लाखाच्या तुलनेत ७४.२८ कोटी, चंद्रपूरमध्ये ५ कोटी पैकी ३ कोटी २ लाख रुपये वसुली झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याला १ कोटीचे उदिष्ट देण्यात आले होते त्यापैकी ६४.३३ लाख वसूल झाले. (प्रतिनिधी)
चौकट
नागपूरपुढे अवघड आव्हान
नागपूर जिल्ह्यापुढे कर वसुलीचे आव्हान अवघड आहे. विभागाच्या ३० कोटींच्या उदिष्टापैकी २० कोटीचे उद्दिष्ट्य नागपूर जिल्ह्याला आहे. यापैकी एप्रिल ते डिसेंबर २०१४ या काळात १२ कोटी ६६ लाखाची वसुली झाली.२०१३ च्या तुलनेत ही वसुली ८२ टक्के कमी आहे. विशेष म्हणजे केबल जोडणीधारकांची संख्या (४ लाख ३४ हजार ९८०) निश्चित असतानाही वसुली रेंगाळली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थकबाकीची रक्कम ही ४१ कोटींवर गेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी प्रयत्न केल्यानंतरही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
-०-०-०-
कर्मचाऱ्यांना धमक्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर वसुलीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली आहे. याचाही परिणाम वसुलीवर झाला आहे.

Web Title: Difficult to meet the challenge: Entertainment Tax Recovery: Nagpur Division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.