शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया आघाडीत मतभिन्नता, काँग्रेसला सतावतेय चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 07:50 IST

तृणमूल, सपा, आप संसदेतील आंदोलनापासून दूर. इतर विरोधी पक्षांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली आणि जेपीसीच्या चौकशीची मागणी करत घोषणाबाजी केली.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अदानी मुद्यावरून विरोधकांनी सोमवारी निदर्शने केली. मात्र, तृणमूल, सपा आणि आप हे पक्ष यापासून दूर राहिले. त्यामुळे इंडिया आघाडीतील मतभिन्नता समोर आली आहे. यामुळे काँग्रेसची काळजी वाढली आहे.

इतर विरोधी पक्षांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली आणि जेपीसीच्या चौकशीची मागणी करत घोषणाबाजी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह द्रमुक, राजद, राष्ट्रवादी (शरद पवार), उद्धवसेना आदी पक्षांच्या नेत्यांनी यावेळी आम्हाला न्याय हवा, अशी घोषणाबाजी केली.हरयाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मोठ्या पराभवानंतर लगेचच इंडिया आघाडीतील मतभेद सुरू झाले. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आघाडीचे नेतृत्व करावे, अशी मागणी तृणमूलने सर्वप्रथम केली. याला राष्ट्रवादी (शरद पवार), राजद, सपा आणि आप यांनी पाठिंबा दिला. मात्र, तृणमूल, सपा आणि आप हे इंडिया आघाडीच्या निदर्शनाला अनुपस्थित राहिले.

सपाच्या सूत्रांनी सांगितले की, संभल हिंसाचाराच्या वेळी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला नाही. तथापि, सपाचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव म्हणाले की, विरोधी गटात सर्व काही ठीक आहे. विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक बोलाविण्याची मागणी केली जाऊ शकते. तृणमूल काँग्रेस, सपा, आप आणि इतरांना असे वाटते की मतदारांना प्रेरित करण्यासाठी योग्य प्रकारचे मुद्दे मांडण्यात राहुल गांधी अयशस्वी ठरले आहेत.

इंडिया आघाडीतील सहकारी पक्षांना काय वाटते?nतेजस्वी यादव (राजद) यांच्यासह इतर अनेक नेत्यांना असेही वाटते की इतर नेत्यांना इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची संधी दिली जावी. सपा आधीच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतून बाहेर पडली होती.nतरीही सपा राष्ट्रीय राजकारणात इंडिया आघाडीचा भाग राहील. इंडिया आघाडीतील घटक पक्षातील मतभेद समोर आल्याने त्यांच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजपचा पराभव करण्याच्या उद्देशाने जून २०२३ मध्ये या आघाडीची स्थापना करण्यात आली होती.

टॅग्स :congressकाँग्रेस