डिझेल चोरल्याचा संशयातून तिघांना नग्न करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 04:58 IST2018-07-16T04:58:33+5:302018-07-16T04:58:36+5:30

डिझेल चोरल्याच्या संशयावरून एक वाहतूक व्यावसायिक व त्याच्या मित्राने तीन जणांना बाजारपेठेत नग्न करून मारहाण केल्याचे उजेडात आले आहे.

 Diesel stolen from the suspicion of thieving | डिझेल चोरल्याचा संशयातून तिघांना नग्न करून मारहाण

डिझेल चोरल्याचा संशयातून तिघांना नग्न करून मारहाण

जबलपूर : डिझेल चोरल्याच्या संशयावरून एक वाहतूक व्यावसायिक व त्याच्या मित्राने तीन जणांना बाजारपेठेत नग्न करून मारहाण केल्याचे उजेडात आले आहे. हा प्रकार ११ जुलै रोजी घडला असला, तरी त्याची व्हिडीओ फीत दोन दिवसांनी समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने जागे झालेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या दोघांना भर बाजारपेठेत नग्न करून वाहतूक व्यावसायिक गुड्डू शर्मा व त्याचा मित्र शेरू यांनी मारहाण केली होती. गुड्डू शर्मा व शेरू यांचा पोलीस शोध घेत आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title:  Diesel stolen from the suspicion of thieving