दुबई एअर शो २०२५ दरम्यान एक मोठा हवाई अपघात झाला. एअर शो दरम्यान तेजस लढाऊ विमान कोसळले. या अपघातात विंग कमांडर नमांश सियाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.दरम्यान, आता अपघाताची कारणे शोधण्यात येणार आहेत. संरक्षण तज्ज्ञ कॅप्टन अनिल गौर (निवृत्त) यांनी एक अंदाज व्यक्त केला आहे. पायलटचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा त्यांचा अंदाज आहे.
शुक्रवारी कॅप्टन गौर यांनी सांगितले की, कॉकपिटमधून डेटा मिळाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण कळेल. या अपघातात विंग कमांडर नमांश सियाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
विमान अपघातात विंग कमांडर नमांश सियाल यांचे निधन झाले. वैमानिकाच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करताना कॅप्टन गौर म्हणाले, "दुबई एअर शो दरम्यान आमचे तेजस जेट विमान कोसळले आणि आमच्या धाडसी वैमानिकाला आपला जीव गमवावा लागला हे दुःखद आहे. दृश्यांवरून असे दिसून येते की अॅक्रोबॅटिक्स दरम्यान जेटने नियंत्रण गमावले असेल किंवा पायलट ब्लॅकआऊट झाले असेल. ब्लॅकआउट म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या कमाल शक्तीचा संदर्भ देते.
कॅप्टन गौर म्हणाले की, पायलट नेहमी जी-सूट घालतात जेणेकरून त्यांच्या पायात रक्त साचू नये. कॉकपिट डेटा मिळाल्यानंतरच नेमके कारण कळेल. जी फोर्समुळे खालच्या शरीरात रक्त साचू शकते, यामुळे पायलटला ब्लॅकआउट होऊ शकते.
शुक्रवारी दुबई एअर शो २०२५ मध्ये तेजस विमान कोसळून आग लागल्याने भारतीय हवाई दलाने पायलटच्या मृत्यूची पुष्टी केली.
आयएएफने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट केले: "आज दुबई एअर शोमध्ये हवाई प्रदर्शनादरम्यान आयएएफ तेजस विमान कोसळले. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला आहे. आयएएफला जीवितहानीबद्दल तीव्र दुःख आहे आणि या दुःखाच्या वेळी शोकग्रस्त कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे."
Web Summary : A Tejas fighter jet crashed during the Dubai Air Show 2025, killing Wing Commander Namansh Sial. Experts suspect pilot control loss or blackout due to G-force may be the cause. Cockpit data is crucial to determine the exact reason for the tragic accident.
Web Summary : दुबई एयर शो 2025 के दौरान तेजस लड़ाकू विमान दुर्घटनाग्रस्त, विंग कमांडर नमांश सियाल की मौत। विशेषज्ञों को संदेह है कि जी-फोर्स के कारण पायलट का नियंत्रण खोना या ब्लैकआउट कारण हो सकता है। दुर्घटना का सटीक कारण जानने के लिए कॉकपिट डेटा महत्वपूर्ण है।