शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 19:33 IST

या दोन मंगळसूत्रांमुळे राजा रघुवंशी हत्याकांडाला एक वेगळे वळण लागले असून, पोलीस यामागचे सत्य उलगडण्यासाठी कसून तपास करत आहेत.

राजा रघुवंशी याच्या हत्येला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास वेगाने सुरू केला आहे. राजाची पत्नी सोनम हिने तिचा प्रियकर राज कुशवाहा याच्यासोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचला होता. आता या प्रकरणात पोलिसांना आणखी महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत, ज्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमच्या काही दागिन्यांची ओळख पटवली जात आहे, ज्यात दोन मंगळसूत्र सापडली आहेत. यातील दुसरे मंगळसूत्र राज कुशवाहाच्या नावाचे असू शकते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रतलाम कनेक्शन आणि जप्त केलेले दागिनेया प्रकरणाच्या तपासासाठी मध्य प्रदेशातील रतलाम शहरात एक दिवस आधीच पोलीस पोहोचले होते. सोनमने येथे काही दागिने विकल्याचा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी रतलाम येथून सोनमचे काही दागिने जप्त केले आहेत, ज्यात राजाची सोन्याची साखळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांनी राजाचा भाऊ विपिन याला हे दागिने ओळखण्यासाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान विपिनने सांगितले की, लग्नाच्या वेळी सोनमला १५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने देण्यात आले होते. विपिनच्या माहितीनुसार, राजा हनिमूनसाठी घराबाहेर पडला तेव्हा त्याने सोन्याची साखळी घातली होती. शिलाँग पोलिसांनी अलीकडेच रतलाममधून आणखी काही दागिने जप्त केले आहेत, जे सोनमच्या दागिन्यांशी जुळवले जात आहेत. विपिनच्या मदतीने या दागिन्यांची ओळख पटवली जात आहे.

दोन मंगळसूत्रांचे गूढपोलिसांनी सोनमकडून दोन मंगळसूत्र जप्त केली आहेत. पोलिसांना संशय आहे की, या दोन्ही मंगळसूत्रांपैकी एक तेच आहे जे राजाने लग्नाच्या वेळी सोनमला घातले होते. तर दुसरे मंगळसूत्र राज कुशवाहाने राजाच्या खुनानंतर सोनमला घातले असावे, अशी शक्यता पोलीस वर्तवली जात आहे. मात्र, सोनमकडे हे दुसरे मंगळसूत्र कुठून आले, याचा तपास अजूनही सुरू आहे.

या दोन मंगळसूत्रांमुळे राजा रघुवंशी हत्याकांडाला एक वेगळे वळण लागले असून, पोलीस यामागचे सत्य उलगडण्यासाठी कसून तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार