शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 11:05 IST

नितीन गडकरी आणि मोदी-शाह यांच्यातील संबंधांची सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. त्यात एका मुलाखतीत गडकरींनी त्यावर स्पष्ट भाष्य केले आहे. 

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जेव्हा पक्षाचे अध्यक्ष होते, तेव्हा ते अमित शाहांना भेटीसाठी वाट बघायला लावायचे असं बोललं जातं, हाच प्रश्न एका मुलाखतीत पत्रकाराने थेट नितीन गडकरींना विचारला. तुम्ही जेव्हा पक्षाचे अध्यक्ष होता, तेव्हा अमित शाहांना वाट बघायला लावायचा. मोदी एकमेव मुख्यमंत्री होते जे तुम्ही पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर भेटीला आले नाहीत. तुमचे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी संबंध कसे आहेत असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला. 

या प्रश्नाचे नितीन गडकरींनी उत्तर देत म्हटलं की, नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला यश मिळे आणि देशासाठी त्यांच्या विचाराने जितकं शक्य असेल तितकं आम्ही योगदान देऊ असं त्यांनी सांगितले. त्याशिवाय माझ्या कार्यालयात १००-१०० लोक भेटायला येतात. आज तुम्ही भेटायला आलात, तुम्हाला जास्त वेळ द्यायचा होता. त्यामुळे छोट्या व्यक्तींची कामे लवकर उरकून घेतली. मोठ्या लोकांना जास्त वेळ द्यायला लागायचा त्यामुळे वाट पाहावी लागते. तुम्हालाही आज पोहे खाऊन बसावं लागलं,  परंतु माझा हेतू त्यामागे खराब नव्हता असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.

तसेच मी कुणी मोठा व्यक्ती नाही. मी पोस्टर चिपकवण्याचे काम केले आहे. पक्षात पावती वाटप करण्याचं काम केलंय. मी कधीही बायोडाटा छापला नाही. मागील ४५ वर्षात एअरपोर्टवर ना माझ्या स्वागतासाठी ना मला निरोप देण्यासाठी कुणी येते. निवडणूक जिंकल्यानंतरही माझ्या सत्काराचा कार्यक्रम होत नाही कारण हे मला आवडत नाही. मी जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयी यांना माझे आदर्श मानतो. संघ आणि विद्यार्थी परिषदेतून मला चांगले संस्कार मिळाले आहेत. माझ्यात जे काही चांगले दिसतंय ते त्यामुळे आहे असं नितीन गडकरींनी सांगितले.

दरम्यान, मी देश, समाज घर आणि कुटुंबासाठी काम करत राहतो. माझं वृत्तपत्र वाचणं जवळपास बंद झालंय. टीव्हीही फार कमी वेळ पाहतो. मी अधिकाधिक युट्यूबवर हिंदी आणि मराठी गाणी ऐकतो. मला गझल ऐकायला आवडते. लकी अलीचे गाणेही मी ऐकतो. मला कुणाशी देणे घेणे नाही. जोपर्यंत जनतेला वाटेल तोपर्यंत मी काम करेल नाहीतर गपचुप माझ्या घरी निघून जाईल असं नितीन गडकरींनी म्हटलं. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी