शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कमलनाथ यांना बागेश्वर बाबांच्या आश्रमात जाऊन फायदा झाला का? निकालातून झाले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 20:59 IST

मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे पारडे आधी जड दिसले. यावेळी विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांनी हिंदुत्वाचे कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचाही फायदा झालेला नाही.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाले आहे. काँग्रेसचा जोरदार पराभव झाला असून मोदी यांच्या जादूसह शिवराज सिंह यांची 'लाडली योजना' हे विजयाचे प्रमुख कारण मानले जात आहे. तर काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर कमलनाथ यांना घेरले असून बाबा बागेश्वर चर्चेत आले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान कमलनाथ यांनी बागेश्वर बाबा यांच्या आश्रमात भेट दिली होती. पण काँग्रेसला त्याचा काही फायदा झालेला दिसत नाही.

भ्रष्टाचारी सरकारला मतदारांनी हद्दपार केले; PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

बाबा बागेश्वर यांच्या आश्रमा परिसरात काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. बिंद, बुंदेलखंड, चंबळ-ग्वाल्हेरचा समावेश असलेल्या मध्य प्रदेशातील सुमारे २६ विधानसभा जागांवर बाबा बागेश्वर यांचा प्रभाव आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार २६ पैकी १८ जागांवर भाजपची मोठी आघाडी आहे. चंबळ-ग्वाल्हेर पट्ट्यात बहुजन समाज पक्षानेही काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. अनेक जागांवर बसपा तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्याचवेळी, सिंधिया यांच्या भागातही काँग्रेसची कामगिरी खूपच खराब झाली आहे. भाजपच्या विजयानंतर पक्ष बदलल्यानंतरही ज्योतिरादित्य सिंधिया यांची जादू कायम असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांनी भाजपप्रमाणे हिंदुत्वाचे कार्ड खेळले होते, पण त्याचा त्यांना काहीही फायदा झालेला दिसत नाही. निवडणूक रॅलीदरम्यान कमलनाथ यांनी अयोध्या राम मंदिराचाही उल्लेख केला होता आणि ते कुलूप काँग्रेसने उघडल्याचे सांगितले होते. मात्र, कमलनाथ यांचे हिंदुत्व कार्ड अयशस्वी ठरले आणि बाबा बागेश्वर यांच्या आश्मात जाऊनही त्यांना फायदा झाला नाही, हे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश