शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 09:20 IST

आपल्या संदेशात भारताने स्पष्ट केले होते की, आपल्याला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताला फायदा व्हावा, यासाठीच अमेरिकेसोबद संपर्क ठेवण्यात आला होता. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेला तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थी केल्याचे बोलले जात आहे. मात्र माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट आहे आणि यात अमेरिकेची कसलीही भूमिका नाही. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे सिनेटर मार्को रुबियो यांच्यात 1 मे रोजी पहिल्यांदा चर्चा झाली होती. त्यावेळी, भारताची इच्छा पाकिस्तानवर तगडा प्रहार करण्याची आहे, असे स्पष्ट करण्यात आले होते.

आपल्या संदेशात भारताने स्पष्ट केले होते की, आपल्याला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताला फायदा व्हावा, यासाठीच अमेरिकेसोबद संपर्क ठेवण्यात आला होता. 

आधी मुनीर यांच्यासोबत चर्चा, नंतर रुबियो यांचा जयशंकर यांना फोन -भारताने 10 मे रोजी पाकिस्तानच्या मोठ्या हवाई तळावर हल्ला चढवला होता. यानंतर, दुसऱ्याच दिवशी अमेरिकन मंत्री रुबियो यांनी सर्वात पहिले पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्याशी संपर्क साधला होता. यानंतर, त्यांनी जयशंकर यांच्याशी संपर्क साधला. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर यासंदर्भात भाष्य केले. हा कॉल कोणत्याही सामंजस्य किंवा "ऑफ-रॅम्प" संदर्भात नव्हता.

यावेळी, पाकिस्तान फायरिंग बंद करण्यास तयार आहे, यासाठी भारताची तयारी आहे का? असा प्रश्न मार्को रुबियो यांनी केला होता. याला उत्तर देत, जर त्यांनी हल्ला केला नाही, तर आम्हीही हल्ला करणार नाही. असे भारताने म्हटले होते.

'सीजफायर'संदर्भात डोनाल्ड ट्रंम्प यांनी केली होती घोषणा - भारत आणि पाकिस्तान यांच्यात 'सीजफायर' संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यासंदर्भात भाष्य केले होते. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यास तयार आहेत, असे ट्रम्प यांनी आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते. दरम्यान त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्याचे कौतुकही केलो होते.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतPakistanपाकिस्तान