गोमंतकीयाच्या चित्राला २८ कोटींची बोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2015 23:14 IST2015-09-19T23:14:00+5:302015-09-19T23:14:00+5:30

फ्रान्सिस न्यूटन सोझा या गोमंतकीय चित्रकाराच्या ‘बर्थ’ नावाच्या चित्रासाठी ४ मिलियन डॉलरची (अंदाजे २८ कोटी) विक्रमी बोली मिळाली आहे. ‘ख्रिस्तीज् सेल’मध्ये

The dialect of Gomantaki's picture is 28 crores | गोमंतकीयाच्या चित्राला २८ कोटींची बोली

गोमंतकीयाच्या चित्राला २८ कोटींची बोली

दिल्ली : फ्रान्सिस न्यूटन सोझा या गोमंतकीय चित्रकाराच्या ‘बर्थ’ नावाच्या चित्रासाठी ४ मिलियन डॉलरची (अंदाजे २८ कोटी) विक्रमी बोली मिळाली आहे. ‘ख्रिस्तीज् सेल’मध्ये हा विक्रम नोंदविण्यात आला. एखाद्या भारतीय कलावंताला जागतिक व्यासपीठावर मिळालेली ही सर्वोच्च दाद आहे. आश्चर्य आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे यापूर्वीचा विक्रमही एका गोमंतकीयाच्याच नावावर आहे. २0१३ साली ‘ख्रिस्तीज् सेल’च्या पदार्पणातच व्ही.एस. गायतोंडे यांच्या चित्राला ३.७ मिलियन डॉलरची (अंदाजे २६ कोटी) रक्कम मिळाली होती.

Web Title: The dialect of Gomantaki's picture is 28 crores