पराभवानंतर धोनीच्या चाहत्यांनी उडवली पुण्याच्या मालकांची खिल्ली
By Admin | Updated: May 22, 2017 19:07 IST2017-05-22T18:35:22+5:302017-05-22T19:07:10+5:30
रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा संघ रोमहर्षक झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून अवघ्या एका धावेने पराभव झाला.

पराभवानंतर धोनीच्या चाहत्यांनी उडवली पुण्याच्या मालकांची खिल्ली
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून अवघ्या एका धावेने पराभव झाला. यासोबतच पहिल्यांदा आयपीएल जिंकण्याचं पुण्याचं स्वप्न भंगलं. पराभवामुळे पुण्याचे चाहते चांगलेच निराश झाले पण यावेळी आयपीएलच्या सुरूवातीला आणि अंतिम सामन्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीवर टीका करणा-या पुण्याच्या मालक बंधूंवर चाहत्यांनी निशाणा साधला. हर्ष गोयंका आणि संजीव गोयंकावर चाहत्यांनी तोंडसुख घेतलं.
आयपीएलच्या सुरूवातीला पुण्याच्या मुंबईवरील पहिल्या विजयानंतर हर्ष गोयंका यांनी धोनीच्या चाहत्यांचा रोष ओढवून घेतला होता. मॅच विनिंग खेळी करणा-या स्मिथचं त्यांनी कौतूक केलं होतं. यावेळी त्यांनी, "स्मिथने दाखवून दिलं कोण आहे जंगलचा राजा, आपल्या कामगिरीने त्याने धोनीला पूर्णतः झाकोळलं, स्मिथची कर्णधारपदी निवड करण्याचा निर्णय योग्यच होता" असं ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतरही धोनीच्या चाहत्यांनी गोयंका यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. वाढती टीका पाहून गोयंका यांनी ते ट्विट नंतर डिलीट केलं.