बीफ खाण्यास प्रवृत्त करणा-याची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून धिंड

By Admin | Updated: January 30, 2016 10:59 IST2016-01-30T10:49:10+5:302016-01-30T10:59:33+5:30

हिंदू नागरिकांना बीफ खाण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीचे मुंडन करून धिंड काढली.

Dhind from Bajrang Dal's activists who have been inspired to eat beef | बीफ खाण्यास प्रवृत्त करणा-याची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून धिंड

बीफ खाण्यास प्रवृत्त करणा-याची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून धिंड

>ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. ३० - तीन हिंदू नागरिकांना बीफ खाण्यास प्रवृत्त केल्याचा व ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यास बळजबरी केल्याचा आरोप ठेवत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीचे मुंडन करून, त्याला चपलांचा हार घालून धिंड काढली. उत्तर प्रदेशातील ओराई येथे शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात दोन तर पीडित व्यक्ती अवधेश सविता याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती झांशी विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक शरद सचिन यांनी दिली. मात्र याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 
शुक्रवारी दुपारी सुमारे २०० जणांचा समूह जलाऊँ जिल्ह्यातील रणधर गावातील अवधेशच्या घरी पोचला. त्या सर्वांनी अवधेशला जबरदस्तीने घराबाहेर काढून ओराई येथे आणले. तेथे त्यांनी अवधेशचे डोक्यावरील केस तसेच भुवया व मिशा कापल्या आणि त्यानंतर त्याला चपलांचा हार घालून त्याची धिंड काढण्यात आली. पोलिसांना याप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अवधेशला नेण्याचा प्रयत्न केला असता, तेथील गर्दीने त्यांना जुमानले नाही. त्यानंतर अधिक पोलिस कुमक बोलावून अवधेशला ओराई कोतवाली पोलिस स्थानकात नेण्यात आले. 
 

Web Title: Dhind from Bajrang Dal's activists who have been inspired to eat beef