शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर; कलाकारांची रुग्णालयात रीघ, चुकीच्या बातम्यांमुळे कुटुंबीयांना मनस्ताप   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 08:07 IST

Dharmendra Health Update: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर १० नोव्हेंबरपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळी इलेक्ट्राॅनिक मीडिया, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियावर त्यांच्या चुकीच्या बातम्या पसरल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर १० नोव्हेंबरपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळी इलेक्ट्राॅनिक मीडिया, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियावर त्यांच्या चुकीच्या बातम्या पसरल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ लेखक-गीतकार जावेद अख्तर यांच्यासह अनेकांचा गैरसमज झाला आणि त्यांनी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. सत्य परिस्थिती समजताच त्यांनी पोस्ट डिलीट केली, पण त्यामुळे धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला. 

धर्मेंद्र यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत रुग्णालयात आहेत. या दरम्यान सलमान खान, शाहरूख खान, आर्यन खानसोबत, गोविंदा, रितेश देशमुख, अमिषा पटेल आदी अनेक कलाकारांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. या दरम्यान धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी त्यांच्या निधनाच्या अफवा फेटाळून लावत अशा बातम्या पसरवणाऱ्यांना कधीच माफ केले जाऊ शकत नाही, असे म्हटले. धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून ते उत्तम प्रकारे बरे होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते लवकरच बरे होतील : ईशाचुकीच्या बातम्यांमुळे नाराज झालेल्या हेमा  मालिनी यांनी लिहिले की, हे जे घडत आहे ते माफ करण्यासारखे नाही. उपचार सुरू असलेल्या आणि सुधारणा होत असलेल्या व्यक्तीबद्दल जबाबदार माध्यमे अशा खोट्या बातम्या कशा काय पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि गैरजबाबदार आहे.संयम बाळगण्याचे आवाहन करत ईशा देओलने लिहिले की, माध्यमे अफवांना वाव देत असून, खोट्या बातम्या पसरवत आहेत. माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत. 

निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढखोट्या बातम्यांनंतर ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेर आणि धर्मेंद्र यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली. रुग्णालय परिसरातील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी अतिरिक्त पोलिस दल तैनात केले आहे. यासोबतच रुग्णालयाच्या आवारातील घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Dharmendra's Health Stable; Celebrities Visit, False News Distresses Family

Web Summary : Veteran actor Dharmendra is hospitalized; his condition is stable. False reports sparked confusion, prompting condolences later retracted. Family members, including Hema Malini and Esha Deol, refuted death rumors. Security increased at the hospital and his residence.
टॅग्स :Dharmendraधमेंद्र